⚡ ब्रेकिंग News

रात्रभरच्या धरणे आंदोलनाची कुणकूण लागताच दिल्ली पोलिसांनी राहुल गांधींना हातापायाला धरून उचललं; ज्ञानेश कुमारांविरोधात पाच दिवसांत सातव्यांदा एल्गार

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आकाशवाणी भवन परिसरात काँग्रेसचे आंदोलन; राहुल गांधी, प्रियंका गांधी, प्रणिती शिंदे, वर्षा गायकवाड यांसह इंडिया आघाडीच्या खासदारांना ताब्यात; आठ तासांहून अधिक काळ ठिय्या; बॅरिकेट्स हटवून रस्ते मोकळे; 'ज्ञानेश कुमारांना भेटल्याशिवाय परत जाणार नाही'चा राहुल गांधींचा आग्रह; SIR प्रक्रिया रद्द करण्याची, मतपत्रिकेद्वारे निवडणुकीची मागणी

क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - सचिन मेनकुदळे

नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी नवी दिल्लीत काँग्रेसचं आंदोलन सुरु आहे. या काँग्रेसच्या आंदोलनामधून खासदार राहुल गांधी यांच्यासह प्रियंका गांधी यांच्या काँग्रेसच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यामुळं राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आकाशवाणी परिसरातून काँग्रेस नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर पोलिसांनी बॅरिकेट्स हटवले आहेत. रस्ते मोकळे करण्यास सुरुवात झाली आहे.

पोलिसांना रात्रभरच्या धरणे आंदोलनाची कुणकूण लागताच त्यांनी कारवाई सुरु केली आहे. खासदार राहुल गांधींसह प्रियंका गांधी तसेच महाराष्ट्रातील काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे, खासदार वर्षा गायकवाड यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याचबरोबर इंडिया आघाडीच्या काही खासदारांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. यानंतर या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी आंदोलनाच्या ठिकाणी लावण्यात आलेले बॅरिकेट्स हटवले आहेत. त्यानंतर रस्ते मोकळे करण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, या आंदोलनाच्या मुद्यानंतर राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

राहुल गांधी आणि काँग्रेसच्या खासदारांनी या ठिकाणी तब्बल आठ तासांहून अधिक काळ ठिय्या मांडल्यानंतर दिल्ली पोलिसांनी अखेर त्यांना ताब्यात घेतलं. काहीही होवो, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना भेटल्याशिवाय परत जाणार नाही, असं सांगणाऱ्या राहुल गांधी यांनी आकाशवाणी भवनमध्येच रात्र घालवण्याची तयारी केली होती. मात्र त्या आधीच दिल्ली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. दरम्यान, काहीही करून आम्ही निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाणार, मुख्य निवडणूक आयुक्तांनी आपल्याला भेट द्यावी यासाठी राहुल गांधी आग्रही होते. पोलिसांनी त्यांना अडवल्यानंतर त्यांनी त्याच ठिकाणी ठिय्या मांडला होता. यामध्ये राहुल गांधी यांच्यासह प्रियंका गांधी, प्रणिती शिंदे, वर्षा गायकवाड तसेच इंडिया आघाडीतील अनेक खासदार उपस्थित होते.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना हटवण्यासाठी संसदेत प्रस्ताव आणावा. SIR प्रक्रियेतून मतदार यादीतून वगळण्यात आलेली नावे सार्वजनिक करावीत. नावे वगळण्यापूर्वी मतदाराला नोटीस आणि अपील करण्याची संधी मिळावी. ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्यात याव्यात.

ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात पाच दिवसांत हा सातव्यांदा एल्गार आहे. यापूर्वीही काँग्रेसने विविध ठिकाणी आंदोलने केली आहेत. या आंदोलनांमुळे निवडणूक आयोगावरील दबाव वाढत असल्याचे दिसून येत आहे.

या प्रकरणामुळे देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एका बाजूला काँग्रेसने ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली असता, दुसऱ्या बाजूला सत्ताधाऱ्यांनी काँग्रेसच्या आंदोलनाकडे राजकीय रंग दिल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणामुळे देशातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी नवी दिल्लीत काँग्रेसचं आंदोलन सुरु आहे. राहुल गांधी, प्रियंका गांधी, प्रणिती शिंदे, वर्षा गायकवाड यांसह इंडिया आघाडीच्या खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आठ तासांहून अधिक काळ ठिय्या मांडल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. 'ज्ञानेश कुमारांना भेटल्याशिवाय परत जाणार नाही' असा राहुल गांधींचा आग्रह होता. SIR प्रक्रिया रद्द करण्याची, मतपत्रिकेद्वारे निवडणुकीची मागणी केली जात आहे. पाच दिवसांत हा सातव्यांदा एल्गार आहे. या प्रकरणामुळे देशातील राजकीय वातावरण तापले आहे.




Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...