क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - सचिन मेनकुदळे
नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काँग्रेस पक्षाने आकाशवाणी भवन परिसरात आंदोलन सुरु केले होते. यावेळी दिल्ली पोलिसांनी लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासह अनेक काँग्रेस नेते आणि समर्थकांना ताब्यात घेतले आहे. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणीसह मतचोरी आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या कृतींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. याच मुद्द्यावरुन महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारसह ज्ञानेश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ज्ञानेश कुमार लोकशाही डुबवत आहेत. त्यांच्यावर तात्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करावी, ही काँग्रेसची ठाम मागणी आहे.
विरोधी पक्षांच्या खासदारांना निवडणूक आयोगाला भेटण्यापासून रोखणे हा गंभीर विषय आहे. कोट्यवधी नागरिकांचे प्रतिनिधित्व करणारे खासदार आपले म्हणणे मांडण्यासाठी जात असताना त्यांना अडवले जाते, तर सामान्य नागरिकांच्या लोकशाही अधिकारांचे काय? असा सवाल सपकाळ यांनी केला आहे. निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीतील निरीक्षणे, निवडणूक आयुक्तांच्या सहकाऱ्यांनी केलेले आक्षेप आणि महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेला पत्रव्यवहार यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. लोकशाही वाचवणे, निवडणूक प्रक्रिया पारदर्शक ठेवणे आणि मतदारांचा अधिकार अबाधित राखणे ही काँग्रेसची ठाम भूमिका आहे असे सपकाळ म्हणाले. ज्ञानेश कुमार लोकशाही डुबवत आहेत. त्यांच्यावर तात्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करावी, ही काँग्रेसची ठाम मागणी आहे. 'वोट चोरी'विरोधात काँग्रेसचा संघर्ष सुरू आहे. फॉर्म-६ मधील बदल, SIR प्रक्रिया आणि मुक्त व निष्पक्ष निवडणुकीशी संबंधित गंभीर प्रश्नांवर निवडणूक आयोगाला उत्तर द्यावे लागेल असे सपकाळ म्हणाले.
इंडिया आघाडीचे नेते निवडणूक आयोगाच्या कार्यालयाजवळ नऊ तासांहून अधिक काळ जमून निवडणूक आयुक्तांसोबत बैठकीची मागणी करत होते. त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, सुमारे ५० खासदारांसह २५० जणांना ताब्यात घेऊन नवी दिल्ली पोलीस लाइन्सच्या किंग्सवे कॅम्पमध्ये नेण्यात येत आहे. निवडणूक प्रणालीतील कथित अनियमिततेच्या निषेधार्थ राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि काँग्रेसचे इतर अनेक नेते मंगळवार दुपारपासून आकाशवाणी भवन परिसरात धरणे आंदोलन करत होते. रात्री ८ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी राहुल गांधी, प्रियंका गांधी, काँग्रेस नेते आणि काही मित्रपक्षांना ताब्यात घेऊन बसमधून नेले.
यापूर्वी, विरोधी 'इंडिया' आघाडीचे खासदार मंगळवारी पार्लमेंट स्ट्रीटपासून निवडणूक आयोगाच्या मुख्यालयापर्यंत मोर्चा घेऊन गेले होते. मात्र, पोलिसांनी त्यांना मध्येच अडवून अनेक खासदार आणि नेत्यांना ताब्यात घेतले. निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचण्याचा प्रयत्न करत असताना राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वद्रा आकाशवाणी भवन परिसरात शिरले आणि एका झाडाखाली बसले.
विरोधी पक्ष मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्याची आणि मतदार याद्यांची विशेष सखोल पुनर्तपासणी (SIR) रद्द करण्याची मागणी करत आहेत. दिल्ली पोलिसांनी आंदोलनस्थळावरून काँग्रेस खासदार पवन खेरा, के. सी. वेणुगोपाल आणि अमरिंदर सिंग राजा वारिंग यांच्यासह अनेक नेत्यांना ताब्यात घेतले.
या प्रकरणामुळे देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एका बाजूला काँग्रेसने ज्ञानेश कुमार यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असता, दुसऱ्या बाजूला सत्ताधाऱ्यांनी काँग्रेसच्या आंदोलनाकडे राजकीय रंग दिल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणामुळे देशातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काँग्रेसने आकाशवाणी भवन परिसरात आंदोलन सुरु केले होते. दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी, प्रियंका गांधी यांसह ५० खासदारांसह २५० जणांना ताब्यात घेतले. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ज्ञानेश कुमार यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. 'ज्ञानेश कुमार लोकशाही डुबवत आहेत' असे ते म्हणाले. 'विरोधी खासदारांना निवडणूक आयोगाला भेटण्यापासून रोखणे गंभीर' असेही त्यांनी सांगितले. 'फॉर्म-६ मधील बदल, SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाला उत्तर द्यावे लागेल' असेही ते म्हणाले. या प्रकरणामुळे देशातील राजकीय वातावरण तापले आहे.


Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.