मातोश्रीच्या मॅडमच्या आग्रहावरून अशोक खरातला पाण्याची जोडणी! शिंदेसेनेचा गंभीर आरोप
“ताज का राज” फुटला तर ठाकरेंच्या तोंडचं पाणी पळेल? शीतल म्हात्रेंचा धमाकेदार ट्विट, उद्धव काळात मंजूर झालेल्या ३९ लाख लिटर पाण्याच्या जीआरचा वाद रंगला!
नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण सध्या राज्यभर चांगलंच गाजत आहे. या प्रकरणात राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी एक्स (ट्विटर) वर केलेल्या एका ट्विटमुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
शीतल म्हात्रे यांनी लिहिले,
“क्रूरकर्मा खरातला दिली गेली पाण्याची जोडणी ही मातोश्रीच्या मॅडमच्या आग्रहाखातर देण्यात आली होती म्हणे… यही तो नही ‘ताज’ का राज? उबाठाला हा प्रश्न विचारलाच पाहिजे. ‘ताज का राज’ फुटला तर यांच्या तोंडचं पाणी पळेल!”
या आरोपानंतर शिवसेना ठाकरे गटाकडून कोणती प्रतिक्रिया येईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना, २५ जून २०२० रोजी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत नाशिकमधील दारणा धरणातून अशोक खरात यांच्या शिवनिका संस्थेला ३९ लाख लिटर पाणी मंजूर करण्यात आले होते. यासाठी धरणापासून ४८ किलोमीटर लांब पाईपलाइन टाकण्यात आली होती. हे पाणी पिण्यासाठी आरक्षित असल्याचे दाखवण्यात आले, मात्र प्रत्यक्षात ते खरातच्या २१ एकर आंब्याच्या बागेसाठी वापरले जात असल्याचा गंभीर आरोप आहे.
त्यावेळी जयंत पाटील हे जलसंपदा मंत्री होते.
अशोक खरात प्रकरणातील ताजे अपडेट्स:
अशोक खरातला २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
एसआयटीकडून चौकशी सुरू असून, त्याच्याविरोधात आता १० वा गुन्हा दाखल झाला आहे.
खरातकडून जप्त करण्यात आलेल्या बंदुकीचा परवाना नाशिक जिल्हा प्रशासनानेच २०१२ मध्ये दिला होता.
१ जानेवारी २०२४ रोजी परवान्याचे नूतनीकरणही झाले होते.
फार्महाऊसवरून २१ काडतुसे जप्त करण्यात आली असून, त्यापैकी ५ काडतुसे वापरलेल्या आहेत. वापर कशासाठी झाला याचा तपास सुरू आहे.
बंदुकीचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे.
अशोक खरात प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.