⚡ ब्रेकिंग News

एपस्टीन फाईल्सवरून नागपूरच्या संघ मुख्यालयावर वंचित-भारत मुक्तीचा मोर्चा; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी काँग्रेसचा निर्धार कायम



एपस्टीन फाईल्सवरून नागपूरच्या संघ मुख्यालयावर वंचित-भारत मुक्तीचा मोर्चा; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी काँग्रेसचा निर्धार कायम

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, "फडणवीस यांचा पोलिसावर दबाव, आमचा मोर्चा निघणार"; एपस्टीन प्रकरणात मोदींच्या राजीनाम्याची मागणी

नागपूर: एपस्टीन फाईल्स  प्रकरणातून नागपूरच्या संघ मुख्यालयावर मोर्चा काढण्याची वंचित बहुजन आघाडी व भारत मुक्ती मोर्चाची योजना पोलिसांनी अडविली आहे. संविधान चौक ते संघ मुख्यालय या दरम्यान मोर्च्याची परवानगी मागण्यात आली होती; मात्र कायदा सुव्यवस्थेचे कारण देत पोलिसांनी ही परवानगी नाकारली आहे. तरीही, या मोर्च्याला काँग्रेसचे पाठबळ असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी परवानगी नाकारली तरी मोर्चा निघणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

"फडणवीस यांचा पोलिसावर दबाव"

हर्षवर्धन सपकाळ यांनी या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, "केंद्र आणि राज्यात गृहखातं सत्य मांडताना ते चिरडून टाकण्याचा प्रयत्न करतो. मोर्चाच्या माध्यमातून आम्ही आमचं म्हणणे मांडतोय. कोणताही हिंसाचार आम्ही करणार नाही. तरीही परवानगी नाकारली तरी आमचा मोर्चा निघणार. देवेंद्र फडणवीस यांचा पोलिसावर दबाव आहे. खरात प्रकरण होऊ कसे दिलेत? मागील पाच वर्षांच्या काळात आपण गृहमंत्री होता. त्यावेळी तुम्ही झोपा काढत होता का?"

"एपस्टीन फाईल्समध्ये मोदींचे नाव येणे गंभीर"

एपस्टीन फाईल्स प्रकरणाला राजकीय वळण देत सपकाळ म्हणाले, "एपस्टीन फाइल्स सारख्या गंभीर प्रकरणात नरेंद्र मोदी यांचं नाव येणे गंभीर आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेण्यात यावा, अशी आमची मोर्चातून मागणी असणार आहे." तसेच, या मोर्चाबाबत बोलताना ते म्हणाले, "संघ आणि काँग्रेसचे मतभेद हा वेगळा भाग आहे. यावेळी आम्ही शांततेने आमचा संवाद पोहचवणार आहोत."

"विषय भरकटवण्यासाठी खरात फाईल"

सपकाळ यांनी खरात फाईल प्रकरणालाही उद्देशून टीका केली. ते म्हणाले, "मूळ एपस्टीन फाईल्सवरून विषय भरकटवण्यासाठी ही राज्यातील खरात फाईल उघडण्याचा त्यांचा कांगावा असावा. एपस्टीन फाईल आली तेव्हा विकृत माणूस किळसवाणा प्रकार करत होता. त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुंग गिळून गप्प होते. रुपाली राजीनाम्यात वैयक्तिक कारणासाठी राजीनामा दिला, असा उल्लेख होता. खालच्या अधिकाऱ्याचे लॉबिंग, खरात आणि नेते यांच्यातील संबंध याची चौकशी व्हावी. हा मुद्दा जनतेपर्यंत पोहचला आहे."

"नेत्यांनी गेंड्याची कातडी घातलीय"

देशातील इंधन सुरक्षिततेवरही सपकाळ यांनी भाष्य केले. ते म्हणाले, "आपली इंधनाची सुरक्षितता एपस्टीन फाईलमुळे अडकली आहे. देशाचे पंतप्रधान या दबावामुळे काम करत आहेत. इंधन पुरवठा खंडित झाल्याचं कुठेही बोलताना दिसून येत नाही. एपस्टीन फाईलमध्ये बरच काही आहे. आगे आगे देखो क्या होता है! देशभरात अनेक नेत्यांनी राजीनामा दिला. आपल्या नेत्यांनी गेंड्याची कातडी घातली आहे."

दत्ता मेघे यांना श्रद्धांजली

दरम्यान, ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांच्या निधनाबद्दल बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, "दत्ता मेघे हे विदर्भाचे नव्हे, तर महाराष्ट्राचं नेतृत्व होते. शिक्षणासाठी संस्थांचं जाळं त्यांनी रोवलं. त्यांचा बराच काळ काँग्रेसमध्ये गेला. त्यांना काँग्रेस पक्षाच्या वतीने श्रद्धांजली."

पोलिसांची भूमिका

दरम्यान, वंचित बहुजन आघाडी व भारत मुक्ती मोर्चाने संविधान चौक ते संघ मुख्यालय या दरम्यान मोर्च्याची परवानगी मागितली होती. कायदा सुव्यवस्थेचे कारण देत पोलिसांनी ही परवानगी नाकारली. फक्त संविधान चौकापुरता निषेध मोर्चा करायचा असेल तर पोलीस अटीशर्तीवर परवानगी द्यायला तयार आहेत. वंचित व भारत मुक्ती मोर्चाचा आरोप आहे की, भारताशी संबंधित एपस्टीन फाईल्स प्रकरण दाबण्याचा संघाकडून प्रयत्न सुरू आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...