⚡ ब्रेकिंग News

इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार; सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली


 'हे प्रकरण आधीच सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे, त्यामुळे नेत्यांनी याचिका दाखल करून न्यायालयात जावे' — सरन्यायाधीश सूर्यकांत; ईमेलद्वारे उत्तर पाठवून कारणेही स्पष्ट केली; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मागितली होती सोमवारी दुपारी ४ ते ५ च्या दरम्यान भेटीची वेळ; ९ ऑक्टोबर रोजी विरोधी खासदारांच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली होती; ६, ७, ८ आणि ९ ऑक्टोबर रोजी SIR आणि ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याविरोधात आंदोलन; राहुल आणि प्रियांका गांधींना तीन वेळा ताब्यात; देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच थेट सर्वोच्च न्यायालयावर १२ ऑक्टोबर रोजी मोर्चा; 'हा मोर्चा राजकीय पक्षांचा नसून एक भारतीय म्हणून' — राहुल गांधी

क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - सचिन मेनकुदळे

नवी दिल्ली : सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली. विरोधी पक्ष नेत्यांना एसआयआर आणि ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याला विरोध दर्शवणारे निवेदन सादर करायचे होते. सरन्यायाधीशांनी सांगितले की, हे प्रकरण आधीच सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे, त्यामुळे नेत्यांनी याचिका दाखल करून न्यायालयात जावे. सरन्यायाधीशांनी विरोधी पक्ष नेत्यांना ईमेलद्वारे उत्तर पाठवून कारणेही स्पष्ट केली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिवसाच्या सुरुवातीला सांगितले होते की, विरोधी पक्षांनी सोमवारी दुपारी ४ ते ५ च्या दरम्यान सरन्यायाधीशांकडे भेटीची वेळ मागितली होती.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी विरोधी पक्ष नेते सरन्यायाधीशांना भेटण्याची योजना आखत होते. मात्र, सरन्यायाधीशांनी ही विनंती फेटाळून लावली. 'हे प्रकरण आधीच सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे, त्यामुळे नेत्यांनी याचिका दाखल करून न्यायालयात जावे' असे सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले. त्यांनी ईमेलद्वारे उत्तर पाठवून ही कारणे स्पष्ट केली.

यापूर्वी, ९ ऑक्टोबर रोजी विरोधी खासदारांच्या एका शिष्टमंडळाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली होती. यापूर्वी, विरोधी पक्षाच्या खासदारांनी ६, ७, ८ आणि ९ ऑक्टोबर रोजी एसआयआर आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याविरोधात आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी राहुल आणि प्रियांका गांधी यांना तीन वेळा ताब्यात घेतले होते.

दुसरीकडे, देशाच्या इतिहासामध्ये बहुदा पहिल्यांदा थेट सर्वोच्च न्यायालयावर उद्या १२ ऑक्टोबर रोजी मोर्चा धडकणार आहे. ज्ञानेश कुमार यांच्या विरोधामध्ये देशामध्ये रणकंदन सुरु असतानाच इंडिया आघाडीने मोठा निर्णय घेतला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज ट्विट करत या संदर्भामध्ये भूमिका स्पष्ट केली आहे. हा मोर्चा राजकीय पक्षांचा नसून एक भारतीय म्हणून आपण सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढणार असून सरन्यायाधीशांना निवेदन देणार असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. या मोर्चामध्ये आपण पक्ष, लिंग, जात, समुदाय आणि राज्यांच्या भिंती ओलांडून एकत्रित मोर्चा काढणार आहोत. देशातील तरुण, सर्व विरोध पक्ष, नागरी समाज आणि लोकशाहीवरती विश्वास ठेवणारे व भारताच्या संविधानाशी पाठीशी उभे राहणारे सर्वजण आमच्या सामील होतील, असा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला.

या प्रकरणामुळे देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एका बाजूला विरोधकांनी सरन्यायाधीशांना भेटण्याची मागणी केली असता, दुसऱ्या बाजूला सरन्यायाधीशांनी ती फेटाळून लावली. या प्रकरणामुळे देशातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली आहे. 'हे प्रकरण आधीच सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे, त्यामुळे नेत्यांनी याचिका दाखल करून न्यायालयात जावे' असे त्यांनी स्पष्ट केले. विरोधी पक्ष नेत्यांना एसआयआर आणि ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याला विरोध दर्शवणारे निवेदन सादर करायचे होते. ९ ऑक्टोबर रोजी विरोधी खासदारांच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपतींची भेट घेतली होती. ६, ७, ८ आणि ९ ऑक्टोबर रोजी आंदोलन करण्यात आले होते. राहुल आणि प्रियांका गांधींना तीन वेळा ताब्यात घेण्यात आले होते. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच थेट सर्वोच्च न्यायालयावर १२ ऑक्टोबर रोजी मोर्चा धडकणार आहे. 'हा मोर्चा राजकीय पक्षांचा नसून एक भारतीय म्हणून' असे राहुल गांधी म्हणाले.




Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...