⚡ ब्रेकिंग News

सरकारचा मोठा निर्णय; MPSC चे अध्यक्ष विवेक भीमनवार यांना पाठवलं सक्तीच्या रजेवर, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश


पेपरफुटी प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार पदावर नसणार; सरकारने भीमनवारांना सक्तीच्या रजेवर पाठवलं; आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची घोषणा; एमपीएससी चौकशी समितीच्या सचिवपदी धडाडीचे अधिकारी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती; मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी विद्यार्थ्यांशी केली चर्चा; दोषी आढळलेल्यांवर कडक कारवाईचे आश्वासन; विद्यार्थ्यांनी तत्त्वतः आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय; भीमनवार म्हणाले 'नैतिकतेला कायम प्राधान्य दिले, चौकशी पूर्ण होईस्तोवर रजेवर जाण्याचा निर्णय'

क्रांती न्यूज (प्रतिनिधी) -  किरण देशमुख

पुणे : एमपीएससी पेपरफूटी प्रकरणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांचा राजीनामा घ्यावा, यासाठी गेल्या ११ दिवसांपासून पुण्यात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु होते. अखेर या आंदोलनाला यश आलं आहे. सरकारनं विद्यार्थ्यांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या आहेत. पेपरफुटी प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत एमपीएससी आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार हे त्या पदावर असणार नाहीत. सरकारनं भीमनवारांना सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे. दरम्यान, सरकारकडून मंत्री शिवेंद्रराजे भोसले हे विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यासाठी आले होते. आंदोलन करणाऱ्या ज्या ज्या विद्यार्थ्यांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत ते गुन्हे मागे घेण्याची घोषणा शिवेंद्रराजेंनी केली आहे. तसेच एमपीएससी संदर्भात जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असंही शिवेंद्रराजे म्हणाले.

गेल्या ११ दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात पुण्यातील एस. एम. जोशी पुलावर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु होते. अखेर विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला यश आलं आहे. पेपरफुटी प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत एमपीएससी आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार हे त्या पदावर असणार नाहीत. सरकारनं भीमनवारांना सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे. यानंतर विद्यार्थ्यांनी तत्त्वतः आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांचा राजीनामा घ्यावा, ही त्यामधील प्रमुख मागणी होती. भीमनवार यांनी जरी राजीनामा दिला नसला तरी ते चौकशी होईपर्यंत त्या पदावर नसणार आहेत.

एमपीएससी पेपरफूट प्रकरणात राज्य सरकारने न्यायालयीन चौकशीची घोषणा केली आहे. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात नैतिकतेला कायम प्राधान्य दिले. त्यामुळे ही चौकशी पूर्ण होईस्तोवर पदावर कार्यरत न राहता या कालावधीत रजेवर जाण्याचा निर्णय मी घेतला आहे. एमपीएससीची स्वायत्तता, विश्वसनीयता आणि विद्यार्थीहिताला कायम माझे प्राधान्य होते आणि यापुढेही असेल असं भीमनवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी एस. एम. जोशी पुलावर बसलेल्या आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्री त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचं त्यांना सांगितलं. त्याचबरोबर, एमपीएससीच्या चौकशी समितीच्या सचिवपदी धडाडीचे अधिकारी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करत असल्याची मोठी घोषणा शिवेंद्रराजे यांनी केली आहे. शिवेंद्रराजे यांनी सरकारचा मसुदा हा रोहित पवारांच्या हाती सोपवला. रोहित पवारांनी हा मसुदा विद्यार्थ्यांना वाचून दाखवला. मात्र त्यामध्ये अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याविषयी काही उल्लेख नव्हता. त्यामुळे विवेक भीमनवार यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी रोहित पवारांनी यावेळी केली. तसेच विद्यार्थी देखील भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते. त्यानंतर सरकारच्या वतीनं मोठा निर्णय घेण्यात आला भीमनवार यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश आलं आहे.

आंदोलन करणाऱ्या ज्या ज्या विद्यार्थ्यांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत ते गुन्हे मागे घेण्याची घोषणा मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच, एमपीएससी संदर्भात जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असंही शिवेंद्रराजे म्हणाले.

सरकारच्या निर्णयानंतर विद्यार्थ्यांनी तत्त्वतः आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, सर्व मागण्या पूर्ण झाल्याची खात्री झाल्यानंतरच आंदोलन पूर्णपणे मागे घेतले जाईल, असे विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले आहे.

या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एका बाजूला विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आल्याचे सांगितले जात असता, दुसऱ्या बाजूला सत्ताधाऱ्यांनी हा निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.

एमपीएससी पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश आलं आहे. सरकारनं एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे. पेपरफुटी प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत ते पदावर असणार नाहीत. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची घोषणा करण्यात आली आहे. एमपीएससी चौकशी समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी तत्त्वतः आंदोलन स्थगित केले आहे. भीमनवार यांनी 'नैतिकतेला कायम प्राधान्य दिले' असे सांगत रजेवर जाण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे.




Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...