⚡ ब्रेकिंग News

यपावाडी पाटीजवळ दुचाकी घसरली; वडिलांचा मृत्यू, मुलगा जखमी

 स्पीडब्रेकरजवळ दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात; ५६ वर्षीय दत्तात्रय भोसले यांचा मृत्यू, आटपाडी पोलिसांत गुन्हा दाखल!

क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - सचिन मेनकुदळे

आटपाडी - आटपाडी तालुक्यातील यपावाडी पाटीजवळ दुचाकी घसरून झालेल्या अपघातात ५६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात दुचाकी चालवणारा त्यांचा मुलगा शिवरत्न भोसले जखमी झाला आहे. या प्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ६ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे सुमारे ५ वाजून ४५ मिनिटांनी यपावाडी पाटीजवळ हा अपघात घडला. शिवरत्न दत्तात्रय भोसले हे आपल्या वडिलांना, दत्तात्रय संभाजी भोसले (वय ५६, रा. यपावाडी) यांना होंडा युनिकॉर्न दुचाकीवरून घेऊन जात होते.

यपावाडी पाटीजवळील स्पीडब्रेकरच्या परिसरातून दुचाकी भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे चालवली जात असताना दुचाकी घसरली. त्यामुळे दुचाकीवरील दोघेही खाली पडले. या अपघातात शिवरत्न भोसले जखमी झाले, तर दत्तात्रय संभाजी भोसले यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. अपघातात दुचाकीचेही नुकसान झाले आहे.

या प्रकरणी दत्तात्रय महादेव मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३७७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब), ३२४(४) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस हवालदार शिंदे यांनी गुन्हा दाखल केला असून, महिला पोलीस उपनिरीक्षक करंजकर या पुढील तपास करीत आहेत.

स्पीडब्रेकरजवळ घडलेल्या या दुर्दैवी अपघातामुळे यपावाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.




Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...