क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - किरण देशमुख
मुंबई : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर आता मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये सीजेपी, ठाकरेंची शिवसेना, मनसेच्या कार्यकर्त्यांसोबतच इतरही आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यामध्ये अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येतोय का याकडे सर्वांचं लक्ष आहे. मुंबई पोलिसांनी तब्बल ३०० आंदोलकांना ताब्यात घेतलं होतं आणि नंतर त्यांना सोडण्यात आलं होतं.
देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा यासाठी नवी दिल्लीत सीजेपीचे आंदोलन सुरू आहे. त्या आधी तीन दिवस राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीने आंदोलन केलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर रविवारी मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात सीजेपीने आंदोलनाची हाक दिली होती. सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी रविवारी सकाळपासूनच शिवाजी पार्क परिसरात तगडा बंदोबस्त ठेवला होता. त्या भागात जाणाऱ्या प्रत्येकाची कसून चौकशी केली जात होती. अशातही आंदोलनासाठी जाणाऱ्या काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
दरम्यान, शिवाजी पार्क परिसरातील कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं जात असताना त्या ठिकाणी अमित ठाकरे पोहोचले आणि त्यांनी पोलिसांना जाब विचारला. आंदोलकांना ताब्यात घेण्यास मनसे पदाधिकाऱ्यांनी विरोध केला. त्यावेळी मनसेच्या काही नेत्यांसह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
दुसरीकडे, शिवसैनिक आणि मुंबई पोलिसांमध्ये जोरदार राडा झाल्याचं दिसून आलं. सीजेपीकडून मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये आंदोलनाची हाक देण्यात आली होती. मात्र, सीजेपीच्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिली नव्हती. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांची धरपकड करण्यात सुरु केली होती. सीजेपीला पाठिंबा देण्यासाठी युवा सेनेकडून आंदोलन करण्यात येणार होतं. मात्र, पोलिसांनी शिवसेना भवनात घुसण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला. यामुळं मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं.
पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलेल्या शिवसैनिकांना सोडवण्यासाठी आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हे रस्त्यावर उतरले. आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे या दोघांनीही पोलिसांची गाडी अडवलेली. आदित्य ठाकरे स्वतःही पोलिसांच्या गाडीवर चढलेले होते. शिवसैनिकांना सोडणार नाही तोवर पोलिसांची गाडी जाऊ दिली जाणार नाही अशी भूमिका आदित्य ठाकरे यांनी घेतलेली.
दरम्यान, अमित ठाकरे आणि मनसैनिकांनीही शिवाजी पार्क पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या आंदोलन केलं. अमित ठाकरे मनसैनिकांना सोबत घेऊन सेनाभवनाबाहेर आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गेले होते. त्यावेळी आदित्य ठाकरेही त्या ठिकाणी पोहोचले आणि पोलिसांशी चर्चा केली. त्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांची सुटका केली.
मुंबई पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या ३०० हून अधिक आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यामध्ये सीजेपी, मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. मात्र, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल होतोय का, याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.
या प्रकरणामुळे मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एका बाजूला आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असता, दुसऱ्या बाजूला ठाकरे बंधूंनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शिवाजी पार्क परिसरात आंदोलन करणाऱ्या ३०० हून अधिक आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये सीजेपी, मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. मुंबई पोलिसांनी ३०० आंदोलकांना ताब्यात घेतलं होतं आणि नंतर सोडलं होतं. अमित ठाकरेंनी पोलिसांना जाब विचारला. आदित्य ठाकरे स्वतः पोलिसांच्या गाडीवर चढले. 'शिवसैनिकांना सोडणार नाही तोवर पोलिसांची गाडी जाऊ दिली जाणार नाही' अशी भूमिका आदित्य ठाकरेंनी घेतली. अमित ठाकरे आणि मनसैनिकांनी शिवाजी पार्क पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या आंदोलन केलं. पोलिसांनी सगळ्या कार्यकर्त्यांची सुटका केली. आदित्य आणि अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल होतोय का? याकडे सर्वांचं लक्ष आहे.


Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.