⚡ ब्रेकिंग News

महेंद्रने सिकंदरला मातीत लोळवलं, पण विजयाचा माज नाही तर...; कुस्तीच्या इतिहासातील सर्वात भावनिक क्षणाचा Video व्हायरल


महेंद्रने सिकंदरला मातीत लोळवलं, पण विजयाचा माज नाही तर...; कुस्तीच्या इतिहासातील सर्वात भावनिक क्षणाचा Video व्हायरल

सेमीफायनलमध्ये प्रतिस्पर्ध्याचा ३-० असा दणदणीत पराभव; विजयानंतर महेंद्र गायकवाडने सिकंदर शेखच्या पाया पडत दाखवला खेळाडूपणा

पुणे: पुण्यात झालेल्या ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेने प्रेक्षकांना अनेक रोमांचक क्षण दिले. अंतिम सामना हर्षवर्धन सदगीरआणि महेंद्र गायकवाड यांच्यात रंगला. या सामन्यात हर्षवर्धन सदगीरने ४-३ असा विजय मिळवत सातवा डबल महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला. मात्र, यापूर्वी झालेल्या सेमीफायनल सामन्यात महेंद्र गायकवाडने सिकंदर शेखचा ३-० असा दणदणीत पराभव करताना जो खेळाडूपणा दाखवला, तो कुस्तीच्या इतिहासातील सर्वात भावनिक क्षण ठरला.

सिकंदरवर महेंद्रची दणदणीत मात

सेमीफायनलमध्ये महेंद्र गायकवाड आणि सिकंदर शेख यांच्यात जबरदस्त लढत झाली. पहिल्या राऊंडपासूनच महेंद्रने आक्रमक पवित्रा घेतला. पहिल्याच मिनिटात त्याने एक गुण मिळवत आघाडी घेतली. त्यानंतर पकड मिळवत त्याने आणखी दोन गुण मिळवले. दुसऱ्या राऊंडमध्ये सिकंदरने आक्रमक प्रयत्न केले, मात्र महेंद्रसमोर त्याला गुणांची पिछाडी भरून काढता आली नाही. अखेर महेंद्रने हा सामना ३-० असा जिंकत अंतिम फेरीत धडक मारली.

जिंकलास भावा... महेंद्र पाया पडला

सिकंदर शेखचा पराभव करत महेंद्र गायकवाड विजयी झाला. सामना जिंकल्यानंतर सहसा विजयी खेळाडू जल्लोष करताना दिसतो. मात्र, महेंद्रने यावेळी वेगळीच भूमिका घेतली. त्याने विजयाचा माज न दाखवता, थेट प्रतिस्पर्धी सिकंदर शेखच्या पाया पडत त्याच्याबद्दल आदर व्यक्त केला. हा भावनिक क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून, तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

अंतिम सामन्यात हर्षवर्धन सदगीर विजयी

अंतिम सामन्याचा विचार करता, पहिल्या हाफमध्ये महेंद्रने १-० अशी आघाडी घेतली. हर्षवर्धनने लगेच एक गुण मिळवत १-१ अशी बरोबरी केली. दुसऱ्या हाफमध्ये महेंद्रला ॲक्टिव्हिटी टास्कमध्ये गुण मिळवता आला नाही, तर हर्षवर्धनने सलग दोन गुण मिळवत ४-१ अशी आघाडी मिळवली. शेवटी महेंद्रने एक गुण मिळवला, मात्र हर्षवर्धनने ४-३ असा विजय मिळवत सातव्यांदा डबल महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला.

खऱ्या खेळाडूचा आदर्श

महेंद्र गायकवाडने विजयानंतर प्रतिस्पर्ध्याच्या पाया पडून खऱ्या खेळाडूचा आदर्श घालून दिला आहे. 'जय पराजय हा खेळाचा भाग आहे, पण प्रतिस्पर्ध्याचा सन्मान करणे ही खरी खेळाडूची ओळख' असे चित्र या व्हिडिओतून स्पष्ट दिसत आहे. या व्हिडिओने कुस्तीप्रेमींसह क्रीडाप्रेमींची मने जिंकली आहेत.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...