⚡ ब्रेकिंग News

पोलिसांनी भोंदू अशोक खरातची 'दैवी' शक्ती उतरवली; क्राइम ब्रँचच्या ऑफिसमधून लंगडत अन् कण्हत बाहेर पडला, VIDEO व्हायरल


 पोलिसांनी भोंदू अशोक खरातची 'दैवी' शक्ती उतरवली; क्राइम ब्रँचच्या ऑफिसमधून लंगडत अन् कण्हत बाहेर पडला, VIDEO व्हायरल

'बोलायची ताकदही उरली नाही', दोन पोलिसांच्या सहाय्याने पाय ओढत गाडीत बसला; 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला'चा पॅटर्न पुन्हा चर्चेत

नाशिक: माझ्याकडे अलौलिक शक्ती आहे आणि मी देवाचा अवतार आहे, असे सांगून अनेक स्त्रियांचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात  याला नाशिक पोलिसांनी रविवारी जोरदार इंगा दाखवला. गेल्या दोन दिवसांपासून विशेष तपास पथकाकडून चौकशी सुरू असताना, त्याला नाशिक गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या हवाली करण्यात आले. यानंतर गुन्हे शाखेच्या कार्यालयातून बाहेर पडताना अशोक खरातची अवस्था अत्यंत केविलवाणी झाली. स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करणाऱ्या या भोंदूला पायी चालण्याचीही ताकद उरली नव्हती.

लंगडत, कण्हत बाहेर पडला

अशोक खरात दोन पोलिसांच्या सहाय्याने कसाबसा चालत नाशिक गुन्हे शाखेच्या कार्यालयाबाहेर पडला. यावेळी तो लंगडत आणि कण्हत चालत होता. स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करणाऱ्या खरातला अक्षरश: पाय ओढत गाडीत बसवण्यात आले. त्याने स्वतःची मान शेजारच्या पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर टाकली होती. प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यांनी ही अवस्था टिपली असून, हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

"बोलायची ताकदही उरली नाही"

गाडीत बसताना अशोक खरातने 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' हे पोलिसांचे ब्रीदवाक्य कसाबसा पुटपुटले. यानंतर तो पोलिसांसोबत गाडीत जाऊन बसला. या सगळ्यानंतर बलात्कारी भोंदूबाबाला नाशिक पोलिसांनी कायद्याचा बालेकिल्ला दाखवल्याची चर्चा रंगली आहे.

तीन दिवसांची चौकशी, नवा गुन्हा

अशोक खरातवर महिला अत्याचार प्रकरणी तिसरा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर एसआयटीने तीन दिवस चौकशी केली. रविवारी त्याचा तपास नाशिक क्राईम ब्रँचकडे वर्ग करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी खरातची अद्दल घडवली. 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' ही पोलिसांची मोहीम पुन्हा एकदा चर्चेत आली.

याआधीही गुन्हेगारांना असाच हिसका

महापालिका निवडणुकीपूर्वी नाशिक शहरात गुन्हेगारी वाढली असताना, काही तथाकथित रीलस्टार्सनी 'नाशिक जिल्हा गुन्हेगाराचा बालेकिल्ला' असे रील्स बनवून गुन्हेगारीचे उदात्तीकरण केले होते. त्यावेळी पोलिसांनी 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' ही मोहीम सुरू करत गुन्हेगारांना पोलिसी खाक्या दाखवली होती. यात गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या आरपीआय (आठवले गट) चे जिल्हाप्रमुख प्रकाश लोंढे आणि त्याच्या टोळीला तसेच ठाकरे गटातून भाजपमध्ये दाखल झालेल्या मामा राजवाडे, अजय बागुल यांसह शहरातील अनेक गुन्हेगारांना कायद्याचा बालेकिल्ला दाखवण्यात आला होता. आता अशोक खरातला हाच पॅटर्न दाखवल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...