चेन्नईच्या 'हॉल ऑफ फेम' फ्रेंडली सामन्यात मॅथ्यू हेडनची षटकार हॅटट्रिक; सुरेश रैना-धोनीसह सर्वजण हेडनच्या फिटनेसचे कौतुक करताना
चेन्नई: चेन्नईतील एम. ए. चिदंबरम स्टेडियम (चेपॉक) येथे आयोजित रोअर २०२६ कार्यक्रम केवळ जुन्या आठवणींना उजाळा देणारा नव्हता, तर मैदानावर रोमांचाची पराकाष्ठा गाठणारा ठरला. चेन्नई सुपर किंग्सने ‘हॉल ऑफ फेम’ची सुरुवात करत आयोजित केलेल्या फ्रेंडली सामन्यात ऑस्ट्रेलियन दिग्गज सलामीवीर मॅथ्यू हेडनने पुन्हा एकदा आपला जुना रौद्र अवतार दाखवत प्रेक्षकांना थक्क केले. ५४ वर्षांच्या वयातही त्याने भारताचा स्टार ऑलराउंडर शिवम दुबे याला एका षटकात तीन षटकार मारत चांगलेच धुतले.
दुबेच्या षटकात षटकार हॅटट्रिक
आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा शिवम दुबे जेव्हा गोलंदाजीसाठी आला, तेव्हा त्याला कदाचित कल्पनाही नव्हती की हेडन अजूनही तितक्याच आक्रमकतेने खेळू शकतो. हेडनने पहिल्याच चेंडूवर लॉन्ग ऑनच्या वरून चेंडू स्टँडमध्ये पाठवला. त्यानंतर पुढील दोन चेंडूंवरही त्याने आपल्या खास शैलीत लॉन्ग ऑफच्या दिशेने सलग दोन षटकार ठोकत षटकारांची हॅटट्रिक पूर्ण केली. तीन चेंडू, तीन षटकार अशी ही कमाल पाहून स्टेडियम दणाणून सोडले.
धोनीही झाला अवाक्
स्टेडियममध्ये उपस्थित सुरेश रैना आणि एमएस धोनी हेडनच्या या धडाकेबाज फलंदाजीवर हसतच राहिले. धोनीसह सर्व माजी खेळाडूंनी हेडनच्या या अवताराचे कौतुक केले. ५४ वर्षांच्या वयातही हेडनची फिटनेस, फुटवर्क, टायमिंग आणि ताकद पाहून सर्वजण अचंबित झाले. या नजाऱ्याने प्रेक्षकांना २००९ ची आठवण करून दिली, जेव्हा मॅथ्यू हेडनने आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप जिंकत चेन्नईसाठी हा मान मिळवणारा पहिला खेळाडू ठरला होता. त्या वेळी त्याच्या ‘मोंगूस’ बॅटने गोलंदाजांचा अक्षरशः समाचार घेतला होता.
हॉल ऑफ फेम स्पेशल
चेन्नई सुपर किंग्सने 'हॉल ऑफ फेम'ची सुरुवात करताना माजी दिग्गजांना एकत्र आणले होते. या प्रदर्शनी सामन्यात हेडनची बॅट जरी मोंगूस नव्हती, तरी त्याची ताकद आणि टायमिंग अगदी पूर्वीसारखीच दिसली. हेडनच्या या अवताराने क्रिकेटप्रेमींची मने जिंकली आहेत. सोशल मीडियावरही या व्हिडिओने वेग घेतला असून, वय हा फक्त आकडा आहे, हे हेडनने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
चेन्नई सुपर किंग्सचा संपूर्ण संघ
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), आयुष म्हात्रे, एमएस धोनी, संजू सॅमसन, डेवाल्ड ब्रेविस, उर्विल पटेल, शिवम दुबे, जेमी ओव्हरटन, रामकृष्ण घोष, नूर अहमद, खलील अहमद, अंशुल कंबोज, गुरजपनीत सिंग, श्रेयस गोपाल, मुकेश चौधरी, नॅशनल चौधरी, प्रवीण चौधरी, प्रशांत वीर, ए. कार्तिक शर्मा, मॅथ्यू शॉर्ट, अमन खान, सरफराज खान, मॅट हेन्री, राहुल चहर, जॅक फॉल्क्स.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.