जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केल्यानंतर वाढली होती शंका; महंत म्हणाले, "कोणाचा त्रास नाही, स्वतःहून केला त्याग"; मात्र दबावाच्या शक्यतेने उलगडले गूढ
अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील तारकेश्वर गडाचे महंत अदिनाथ महाराज शास्त्री यांना गेल्या रविवारी (१६ मार्च) जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने भाविकांमध्ये मोठी खळबळ उडाली होती. सुरुवातीला आत्महत्येच्या प्रयत्नाची चर्चा होती. मात्र, आता एक आठवडा उलटल्यानंतर महंतांनी स्वतःच या प्रकरणातील धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांनी स्वतःच्या हातांनी आपले गुप्तांग छाटल्याची कबुली दिली आहे.
शस्त्रक्रियेनंतर महंतांचं वक्तव्य
रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी अदिनाथ महाराज यांच्यावर तातडीची शस्त्रक्रिया (Surgery) केली होती. शस्त्रक्रियेनंतर संसर्गाचा धोका असल्याने डॉक्टरांनी त्यांना गर्दीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. आता प्रकृती स्थिर असून ते लवकरच गडावर येतील, असेही त्यांनी सांगितले होते. मात्र, आता त्यांनी या घटनेबाबत स्पष्टीकरण देताना सांगितले की, "जो काही जननेंद्रियाचा त्याग झाला, तो मी स्वतःहून करून घेतला. कोणाचाही काहीच त्रास नाही."
नेमकं काय घडलं होतं?
१६ मार्च रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता महंत आपल्या भक्तांना सोडून स्वतःच्या खोलीत निघून गेले. यानंतर त्यांनी खोलीत स्वतःच्या गुप्तांगावर शस्त्राने वार करून घेतले. कोणीतरी खोलीत गेल्यानंतर ते जखमी अवस्थेत आढळून आले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर त्यांच्या अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील आणि बीड जिल्ह्यातील भक्त परिवारात मोठी खळबळ उडाली होती.
दबावाची शक्यता कायम
अदिनाथ महाराज यांनी स्वतःहून हे पाऊल उचलल्याचे सांगितले असले तरी, त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेक शंका उपस्थित झाल्या आहेत. त्यांच्यावर काही दबाव होता का? कोणाच्या सांगण्यावरून त्यांनी हे कृत्य केले का? अशी चर्चा सध्या सुरू आहे. तसेच, मला भेटण्यासाठी कोणीही गडावर येऊ नये, असे आवाहनही त्यांनी भक्तांना केले आहे. यामुळे या प्रकरणातील गूढ आणखी वाढले आहे. पोलिसांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, घटनेचा तपास सुरू केला आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.