⚡ ब्रेकिंग News

पोलीस आयुक्तालयातच शिपायाने स्वतःवर गोळी झाडली; QRT जवान विजय नागापुरे यांनी घेतला टोकाचा निर्णय

पोलीस आयुक्तालयातच शिपायाने स्वतःवर गोळी झाडली; QRT जवान विजय नागापुरे यांनी घेतला टोकाचा निर्णय

अमरावती शहर पोलीस आयुक्त कार्यालयात एक धक्कादायक आत्महत्या प्रकरण समोर आले आहे. शीघ्रकृती दलात (QRT) कार्यरत असलेल्या एका पोलीस जवानाने आज सकाळी कार्यालय परिसरातच स्वतःवर गोळी झाडून आपले जीवन संपवले.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत जवानाचे नाव विजय नागापुरे असे आहे. गुरुवारी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास क्युआरटी कार्यालयात ही घटना घडली. गोळीबाराचा आवाज ऐकताच इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

या घटनेमुळे अमरावती पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस या प्रकरणाचा सविस्तर तपास करत आहेत.

भंडाऱ्यात आणखी एक खळबळजनक घटना

शिवनाळा वाळू घाटावर चौकीदाराने ग्रामस्थावर देशी कट्ट्याने हल्ला; आरोपीला अटक

भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील शिवनाळा वाळू घाटावर काल सायंकाळी एक गंभीर घटना घडली. वाळू वाहतुकीमुळे होणाऱ्या धुळीच्या त्रासाबाबत तक्रार करणाऱ्या ग्रामस्थांवर वाळू घाटाच्या चौकीदाराने देशी कट्ट्याने डोक्यात जबर मारहाण केली.

जखमी झालेल्या ग्रामस्थाचे नाव शैलेश इटनकर (२८) असे असून, आरोपी चौकीदार नूरबेग अब्बास बेग याला पवनी पोलिसांनी देशी कट्ट्यासह अटक केली आहे.

हरित लवादाने बंदी उठवल्यानंतर फक्त दोन दिवसांतच ही घटना घडल्याने भंडारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यात वाळू वाहतुकीवरून एकाची हत्या झाल्याची पार्श्वभूमी लक्षात घेता, आता महसूल आणि पोलीस प्रशासनाने कडक खबरदारी घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

दोन्ही घटनांमुळे विदर्भात कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...