⚡ ब्रेकिंग News

विट्यात ज्याची दहशत होती, तो अखेर पोलिसांच्या जाळ्यात! सुशांत वायदंडेचा 'करेक्ट कार्यक्रम'; MPDA कायद्यांतर्गत एक वर्ष स्थानबद्धतेचे आदेश

  विट्यात ज्याची दहशत होती, तो अखेर पोलिसांच्या जाळ्यात! सुशांत वायदंडेचा 'करेक्ट कार्यक्रम'; MPDA कायद्यांतर्गत एक वर्ष स्थानबद्धतेचे आदेश

 2020 ते 2025 दरम्यान खूनप्रयत्न, विनयभंग, दुखापतीसह अनेक गंभीर गुन्हे; जिल्ह्यातील दुसरी मोठी कारवाई

सांगली जिल्ह्यातील विटा परिसरात दहशत माजवणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी MPDA कायद्यांतर्गत कारवाई करत मोठा दणका दिला आहे. विटा पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार सुशांत ऊर्फ हरी दिनकर वायदंडे (वय २४, रा. आळसंद, ता. खानापूर) याच्यावर एम.पी.डी.ए. (MPDA) कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली असून त्याला एक वर्षाच्या कालावधीसाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिले आहेत.

दहशत माजवणारा इतिहास:

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांत वायदंडे हा विटा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार आहे. सन २०२० ते २०२५ या कालावधीत त्याने परिसरात आपली दहशत निर्माण करण्यासाठी खुनाचा प्रयत्न करणे, महिलांना अश्लील शिवीगाळ करून विनयभंग करणे, घातक शस्त्राने दुखापत करणे आणि धमकावणे यांसारखे गंभीर गुन्हे केले आहेत. हद्दपारीच्या कालावधीतही त्याने प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करून नियमांचे उल्लंघन केले होते.

कारवाईची प्रक्रिया:

विटा पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी या गुन्हेगाराविरुद्ध स्थानबद्धतेचा प्रस्ताव उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला होता. या प्रस्तावाचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी जनहित आणि सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी हे आदेश दिले.

वर्षातील दुसरी मोठी कारवाई:

सांगली जिल्ह्यात चालू वर्षातील एम.पी.डी.ए. अंतर्गत ही दुसरी मोठी कारवाई आहे. यापूर्वी सांगली शहर पोलीस ठाणे हद्दीतील पवन धर्मेंद्र साळुंखे याच्यावर अशीच कारवाई करण्यात आली होती. पोलीस प्रशासनाने यापुढेही जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांवर अशाच प्रकारे कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.

कारवाईत सहभागी अधिकारी:

पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. यामध्ये विटा उपविभागाचे डीवायएसपी विपुल पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, विटा पोलीस ठाण्याचे निरीक्षक धनंजय फडतरे व त्यांच्या पथकातील बसवराज शिरगुप्पी, दीपक गट्टे, विलास मोहिते आणि वैभव कोळी यांनी सक्रिय सहभाग घेतला.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...