⚡ ब्रेकिंग News

राज्यसभेसाठी ठाकरे गटाचा दावा पडला फोल! शरद पवारांना जागा सुटली; आदित्य ठाकरे फॉर्म भरायला का आले नाहीत? सचिन अहिर यांचं स्पष्टीकरण

  राज्यसभेसाठी ठाकरे गटाचा दावा पडला फोल! शरद पवारांना जागा सुटली; आदित्य ठाकरे फॉर्म भरायला का आले नाहीत? सचिन अहिर यांचं स्पष्टीकरण

 आदित्य ठाकरे होते आग्रही, पण उद्धव ठाकरेंनी घेतला निर्णय; अर्जुन तेंडुलकरच्या लग्नामुळे आदित्य उपस्थित राहू शकले नाहीत

महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या एकमेव जागेवरून सुरू असलेला पेच अखेर सुटला असून ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र, या जागेसाठी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आग्रही होते. शरद पवारांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळी आदित्य ठाकरे उपस्थित नसल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. यावर ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

आदित्य ठाकरे होते आग्रही

ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर म्हणाले, "आदित्य ठाकरे या जागेबद्दल बोलले होते, हे नाकारता येत नाही. मात्र, हा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला. जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे हे उद्धव ठाकरेंना भेटले आणि त्यानंतर हा निर्णय घेतला असेल."

फॉर्म भरताना का नव्हते आदित्य?

शरद पवारांचा अर्ज भरताना आदित्य ठाकरे उपस्थित नसल्याबद्दल बोलताना सचिन अहिर म्हणाले, "आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे अर्जुन तेंडुलकर यांच्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहिले होते. त्यामुळेच ते पवारांचा अर्ज भरताना येऊ शकले नाहीत. आमचे नेते भास्कर जाधव, अनिल परब आणि मी स्वतः त्या वेळी उपस्थित होतो. काल पत्रकार परिषद झाली तेव्हा उपस्थित राहण्याचा काही ठरले नव्हते. पण आमचा पाठिंबा शरद पवारांना आहे."

महाराष्ट्रातील उमेदवार यादी:

भाजप: रामदास आठवले, विनोद तावडे, माया चिंतामण ईवनाते, रामराव वडकुते

शिवसेना (शिंदे गट): ज्योती वाघमारे

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट): पार्थ पवार

महाविकास आघाडी: शरद पवार

सात जागांसाठी सातच उमेदवार असल्याने राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार हे स्पष्ट झाले आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...