⚡ ब्रेकिंग News

४०० कोटींची 'धुरंधर २' पायरेटेड साईट्सवर HD मध्ये लीक; निर्मात्यांचं टेन्शन वाढलं


४०० कोटींची 'धुरंधर २' पायरेटेड साईट्सवर HD मध्ये लीक; निर्मात्यांचं टेन्शन वाढलं

रिलीज झाल्यानंतर काही तासांतच ऑनलाईन व्हायरल; पायरसीमुळे बॉक्स ऑफिसवर परिणामाची शक्यता, प्रेक्षकांना कायदेशीर कारवाईचा इशारा

मुंबई: या वर्षातील सर्वात मोठ्या आणि चर्चित चित्रपटांपैकी एक असलेला 'धुरंधर २'  ने रिलीजच्या पहिल्याच दिवसापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. रणवीर सिंहच्या दमदार अॅक्शन अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकली असतानाच, निर्मात्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच पायरेटेड साईट्सवर एचडी प्रिंटमध्ये लीक झाला आहे. यामुळे निर्मात्यांची धाकधूक वाढली असून, चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कमाईवर याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

रिलीज होताच सिनेमाची एचडी प्रिंट लीक

थिएटर्समध्ये सिनेमा रिलीज झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच 'धुरंधर २'ची एचडी प्रिंट इंटरनेटवरील अनेक बेकायदेशीर वेबसाईट्सवर लीक झाली. काही जणांनी या पायरेटेड साईट्सवरून सिनेमा डाऊनलोड करून पाहिला तर, काहींनी इतरांनाही मोफत सिनेमा पाहण्याचे आवाहन करायला सुरुवात केली. ही बाब चित्रपटाच्या निर्मात्यांसाठी धोकादायक ठरू शकते.

तीन लाख रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो

प्रेक्षकांनी सावध राहण्याची गरज आहे. कोणत्याही बेकायदेशीर साईटवरून चित्रपट डाऊनलोड करून पाहणे हा भारताच्या 'कॉपीराइट कायदा, १९५७'  अंतर्गत शिक्षापात्र गुन्हा आहे. असे केल्यास तीन लाख रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो. सिनेसृष्टीत पायरसीला आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या जात असल्या तरीही, मोठ्या चित्रपटांची लीक होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत.

बॉक्स ऑफिस कमाईवर परिणामाची शक्यता

'धुरंधर २'ची ऑनलाईन लीक झालेली प्रिंट केवळ चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कामगिरीलाच धक्का पोहोचवू शकते, तर या प्रोजेक्टच्या यशासाठी झटलेल्या सर्व कलाकार, तंत्रज्ञ आणि कर्मचाऱ्यांच्या मेहनतीवरही पाणी फेरते. पायरसी केवळ सिनेमांची चोरी करत नाही, तर या निर्मितीमध्ये योगदान दिलेल्या असंख्य कलाकार आणि तंत्रज्ञांच्या समर्पणाचेही नुकसान करते.

प्रेक्षकांना निर्मात्यांचे आवाहन

निर्मात्यांनी प्रेक्षकांना आवाहन केले आहे की, चित्रपट पाहण्यासाठी केवळ कायदेशीर आणि अधिकृत पद्धतींचाच वापर करावा. असे केल्याने क्रिएटिव्हिटीला वाव मिळेल आणि कलाकारांचा उत्साहही कायम राहील.



Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...