⚡ ब्रेकिंग News

पाण्यात गुंगीचे औषध घालून ५० वर्षीय चुलत चुलत्याने पुतणीवर केलं अत्याचार; जीवे मारण्याचीही धमकी, बीडचं केज हादरलं

                                                            

पाण्यात गुंगीचे औषध घालून ५० वर्षीय चुलत चुलत्याने पुतणीवर केलं अत्याचार; जीवे मारण्याचीही धमकी, बीडचं केज हादरलं

पाच महिन्यांपूर्वीची घटना विवाहानंतर उघडकीस; आरोपी फरार, पोलिसांकडून शोध सुरू

बीड: केज तालुक्यातील युसुफ वडगाव पोलीस ठाणे हद्दीतील एका गावात १९ वर्षीय तरुणीवर तिच्याच ५० वर्षीय चुलत चुलत्याने पाण्यात गुंगीचे औषध घालून अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. केवळ अत्याचार न करता आरोपीने तरुणीला जीवे मारण्याची धमकीही दिली. ही घटना पाच महिन्यांपूर्वी घडली असून, तरुणीच्या विवाहानंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे.

पीडित तरुणीने कुटुंबीयांना सर्व प्रकार सांगितल्यानंतर कुटुंबीयांनी युसुफ वडगाव पोलीस ठाणे गाठले. पीडितेच्या तक्रारीवरून शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या फरार असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

पीडित तरुणीचा अत्याचारानंतर पंधरा ते वीस दिवसातच विवाह झाला. तीन दिवसांपूर्वी ती गावाकडे आली असता तिने कुटुंबीयांना घडलेला प्रकार सांगितला. यानंतर तातडीने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली.

 दुसरी घटना (बीड - परळी येथील घटना)

दुकानात बोलावून १० वर्षीय शाळकरी मुलीवर अत्याचार; ५० वर्षीय आरोपीविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

दोन महिन्यांपूर्वीही केला होता अत्याचार; जीवे मारण्याची धमकी देत राबविली दुसरी घटना, आरोपी गजाआड

बीड: परळी तालुक्यातील एका गावात १० वर्षीय शाळकरी मुलीवर ५० वर्षीय किराणा दुकानदाराने दोन वेळा अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने पीडित मुलीला दुकानात बोलावून घेत तिच्याशी वारंवार अत्याचार केला. तसेच, हे प्रकरण उघडकीस आल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पीडित मुलगी ५ वी वर्गात शिक्षण घेते. आरोपी बालाजी पांचाळ याने सुरुवातीला दोन महिन्यांपूर्वी अत्याचार केला आणि मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली. याच कारणामुळे मुलगी घाबरून गेली होती. मात्र, दोन महिन्यांनंतर आरोपीने पुन्हा त्याच कृत्याची पुनरावृत्ती केली.

या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी आरोपी बालाजी पांचाळ याला ताब्यात घेतले आणि परळी ग्रामीण पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी त्याच्याविरोधात पोस्को (POCSO) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...