रुपाली चाकणकर-अशोक खरात प्रकरणी आरोपांची झाडी; ‘चाकणकर बाई स्वतः तंत्र-मंत्र विद्या करायच्या, सोमवती अमावस्येला अनामिका बोट कापून केली कृत्ये’, अंधारे यांचा गंभीर आरोप
रुपाली चाकणकर आणि कॅप्टन अशोक खरात यांच्या वादग्रस्त प्रकरणात आता शिवसेना (ठाकरे गटाच्या) नेत्या सुषमा अंधारे यांनी मोठा आरोप केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही या प्रकरणात हस्तक्षेप असल्याचा दावा करत त्यांचा सीडीआर तपासण्याचे धाडस गृहखाते करणार का, असा सवाल अंधारे यांनी केला आहे.
अंधारे म्हणाल्या, “चाकणकर बाई स्वतः तंत्र-मंत्र विद्या करायच्या. २ सप्टेंबर २०२४ रोजी सोमवती अमावस्येच्या दिवशी त्यांनी स्वतःची अनामिका (बोट) कापून अशा पद्धतीची तंत्र-मंत्र विद्या केली.”
मिलिंद नार्वेकर किंवा जयंत पाटील यांची करंगळी कापल्याचे फोटो नसल्याचे सांगतानाच त्यांनी एकनाथ शिंदे यांचा पूजा करतानाचा फोटो असल्याचा दावा केला. अंधारे पुढे म्हणाल्या, “एकनाथ शिंदेंचा तिथे हस्तक्षेप होता अशाही गोष्टी पुढे येत आहेत. एकनाथ शिंदे, दीपक केसरकर दर महिना-दीड महिन्याला तिकडे जात होते. शिंदे ज्यांच्याकडे नेहमी जातात त्या अमित शाह यांच्यासोबतही कॅप्टन खरातचा फोटो आहे.”
या सर्वांची तपासणी करण्याची जबाबदारी गृहखात्यावर असल्याचे सांगतानाच अंधारे यांनी विचारले, “गृहखाते किती हिंमत दाखवेल एकनाथ शिंदे यांचं सीडीआर तपासण्याची?”
सीडीआर तपासणीची मागणी:
रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांचे सीडीआर तपासले जावेत, अशी मागणी अंधारे यांनी केली. पीडितांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री दोन-दोन वाजताही चाकणकर फोन करून धमक्या देत होत्या, असा आरोप करत त्यांनी या दोघांच्या संभाषणाचा तपशीलही सीडीआरमधून समोर आला पाहिजे, असे म्हटले.
चाकणकर यांनी खरात यांना वाचविण्यासाठी पोलीस अधिकारी किंवा राजकीय नेत्यांशी संपर्क केला का, याचाही तपास व्हावा, अशी मागणीही त्यांनी केली.
रुपाली चाकणकर यांच्या अटकेची मागणी:
गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांचे पहिल्यांदाच आभार मानत अंधारे म्हणाल्या की, सध्या झालेली कारवाई उत्तम आहे. मात्र, जर गृहमंत्री खरोखरच महाराष्ट्रातील बहिणींचे लाडके भाऊ असतील, तर लैंगिक शोषण करणाऱ्या एका ‘लिंगपिसाट’ माणसाला महिला आयोगाच्या अध्यक्षेने पाठीशी घालत असताना त्यांनी तात्काळ हस्तक्षेप करावा, असेही त्या म्हणाल्या.
“अशा महिलेला गृहमंत्री पाठीशी घालतील, असे मला वाटत नाही. गृहमंत्र्यांनी तात्काळ कारवाई करून रुपाली चाकणकर यांना अटक करावी,” असा स्पष्ट आरोप अंधारे यांनी केला.
नार्को टेस्ट आणि संपत्ती तपासणीची मागणी:
चाकणकर यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे, तसेच आर्थिक गुन्हे शाखा आणि ईडीने त्यांच्या आणि खरात यांच्या संपत्तीचे स्रोत तपासले पाहिजेत, अशी मागणीही अंधारे यांनी केली.
शेवटी त्या म्हणाल्या, “माझ्या पक्षाचा जरी कोणी यात अडकला असेल, तर त्याचीही गय केली जाऊ नये. कारण हा प्रश्न महिलांच्या अस्मितेचा आणि लेकी-बाळींच्या इभ्रतीचा आहे. या प्रश्नाच्या आड कोणत्याही पक्षाचे राजकारण येऊ नये.”
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.