⚡ ब्रेकिंग News

भोंदूबाबा प्रकरणानंतर राजीनाम्याची हुलकावणी; उपमुख्यमंत्र्यांकडून पुढील कारवाईला सुरुवात.


  भोंदूबाबा प्रकरणानंतर राजीनाम्याची हुलकावणी; उपमुख्यमंत्र्यांकडून पुढील कारवाईला सुरुवात.

 सुनेत्रा पवारांची रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर पहिली ॲक्शन, कारवाईला सुरुवात

मुंबई : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी काल (शुक्रवारी, ता. २०) रात्री आपल्या पदाचा राजीनामा दिला. नाशिकमधील भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात यांच्याशी असलेल्या निकटवर्तीय संबंधांमुळे हा वाद ऐरणीवर आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या निर्देशानंतर ही कारवाई करण्यात आली.

राजीनामा प्रक्रियेदरम्यान सुनेत्रा पवार यांनी स्वतः या प्रकरणी पुढाकार घेतला. चाकणकर यांनी रात्री उशिरा सुनेत्रा पवार यांच्याकडे मुख्यमंत्र्यांच्या नावे लिहिलेला राजीनामा सुपूर्द केला. यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपली भूमिका स्पष्ट केली.

सुनेत्रा पवारांची रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर पहिली प्रतिक्रिया

सुनेत्रा पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर यांचा राजीनामा मला प्राप्त झाला आहे. सद्य परिस्थिती आणि सुरू असलेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पदाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला आहे. ही चौकशी निष्पक्ष आणि पारदर्शक होण्याच्या दृष्टीकोनातून मी त्यांचा राजीनामा पुढील कार्यवाहीसाठी माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे पाठवत आहे.”

राजीनामा देताना चाकणकरांनी नेमकं काय म्हटलंय?

राजीनामा दिल्यानंतर चाकणकर म्हणाल्या, “आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा, आमच्या नेत्या तसेच राज्याच्या सन्माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रावाहिनींकडे माझ्याकडे असलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा सुपूर्द केला. सध्या विविध माध्यमातून होत असलेल्या आरोपांची निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने चौकशी व्हावी म्हणून नैतिक जबाबदारी स्वीकारत मी हा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत योग्य तो निर्णय आदरणीय सुनेत्रावहिनी घेतील! या प्रकरणाबाबत लवकरच मी सविस्तर भूमिका मांडेल.”

राजीनामा पत्रात काय?

राजीनामा पत्रात नमूद केलं आहे की, “मी, सौ. रुपाली निलेश चाकणकर, वरील विषयान्वये आपणांस विनंतीपूर्वक कळवू इच्छिते की, दि. १५ ऑक्टोबर २०२४ रोजी माझी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची अध्यक्षा म्हणून नियुक्ती झाली होती. माझ्या वैयक्तिक कारणाने मी स्वेच्छेने सदर पदाचा राजीनामा ह्या पत्राद्वारे आपणांस सादर करत आहे. आजवर माझ्यावर विश्वास दाखवून आपण मला सर्वतोपरी सहकार्य केले त्याबद्दल मी आपली व सर्व सहकाऱ्यांची शतशः ऋणी आहे. भविष्यातही आपले असेच सहकार्य राहील असा मला विश्वास आहे.”

अशोक खरात प्रकरणी चाकणकर काय म्हणाल्या?

अशोक खरात यांच्याशी असलेल्या संबंधांबद्दल चाकणकर म्हणाल्या, “खरातच्या ट्रस्टवरील माझा कार्यभार ८ ऑगस्ट २०२५ रोजी संपला आहे. खरात पती-पत्नीला माझ्या परिवाराने गुरू मानले. ही घटना समजली तेव्हा मला धक्का बसला. खरात आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल माहिती असायचे कारण नव्हते. माझ्याविषयी चुकीच्या बातम्या सुरू आहेत.”

दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी हा राजीनामा पुढील कारवाईसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवला असून, मुख्यमंत्री तो राज्यपालांच्या मंजुरीसाठी पाठवतील, अशी माहिती आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...