⚡ ब्रेकिंग News

‘प्रयत्ने चिंचोकी घासता...’ अशोक खरातवर सचिन गोस्वामींची ६ शब्दांची मार्मिक पोस्ट व्हायरल!

‘प्रयत्ने चिंचोकी घासता...’ अशोक खरातवर सचिन गोस्वामींची ६ शब्दांची मार्मिक पोस्ट व्हायरल!

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम दिग्दर्शकांनी भोंदूबाबाच्या विकृत कारनाम्यावर एका ओळीत टोकला टोला; पोस्ट तुफान शेअर होतेय!

नाशिकच्या अशोक खरात प्रकरणानं  संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात खळबळ माजवली आहे. महिलांच्या अंधश्रद्धेचा फायदा घेऊन लैंगिक शोषण, आर्थिक फसवणूक आणि अघोरी कृत्यं करणाऱ्या या नराधम भोंदूबाबावर आतापर्यंत सात गुन्हे दाखल झाले आहेत. ५८ हून अधिक अत्याचाराचे व्हिडीओ पोलिसांच्या ताब्यात आले असून, एसआयटी तपासासह आयकर विभागाची आर्थिक चौकशीही वेगाने सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे प्रसिद्ध दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी फेसबुकवर एका ओळीतली अत्यंत मार्मिक पोस्ट केली आहे. त्यांचे शब्द आहेत:

“प्रयत्ने चिंचोकी घासता लाख ही मिळे...”

ही फक्त सहा शब्दांची पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली असून, नेटकऱ्यांकडून तिच्यावर भरघोस प्रतिक्रिया येत आहेत.

यापूर्वी अभिनेते अतुल कुलकर्णी यांनीही या प्रकरणावर सवाल उपस्थित करत म्हटलं होतं की, “जर हे लोक पकडले गेले तरच भोंदू ठरतात, मग त्या आधी ते कोण असतात?”

सध्या अशोक खरात, नीरज जाधव आणि दीपक लोंढे यांची एसआयटीकडून कसून चौकशी सुरू आहे. त्याच्या ५७ सातबारा उताऱ्यांची, कोट्यवधींच्या जमीन-जुमल्यांची आणि देणगीदारांच्या आर्थिक व्यवहारांचीही तपासणी होत आहे. प्रकरण अधिकाधिक गंभीर होत चाललं असताना, सचिन गोस्वामींच्या या टोकदार पोस्टनं अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीच्या विरोधातला राग व्यक्त केला आहे.


Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...