⚡ ब्रेकिंग News

पुण्यात धक्कादायक प्रकार! वाड्यासाठी बोअरवेल खोदली अन् थेट मेट्रोच्या बोगद्यात ६ इंचाचे छिद्र – प्रवाशांच्या सुरक्षेला मोठा धोका


 पुण्यात धक्कादायक प्रकार!

वाड्यासाठी बोअरवेल खोदली अन् थेट मेट्रोच्या बोगद्यात ६ इंचाचे छिद्र – प्रवाशांच्या सुरक्षेला मोठा धोका

पुणे : शिवाजीनगर ते स्वारगेट या भूमिगत मेट्रो मार्गावर अनधिकृत बोअरवेल खोदकामामुळे मेट्रोच्या बोगद्याला ६ इंची छिद्र पडल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवार पेठेतील शिवाजी रोडवर खडक पोलीस चौकीसमोर (घर क्र. ४१५) एका जुना वाडा पाडून नवीन बांधकाम सुरू असताना ही घटना घडली.

१४ मार्च रोजी घरमालक धनंजय मोठे (तुषार मोठे) यांच्या मालकीच्या जागेवर बोअरवेल खोदताना ड्रिल थेट ६० ते १०० फूट खाली असलेल्या मेट्रो बोगद्याच्या काँक्रीट अस्तरापर्यंत पोहोचले. यामुळे टनेल लाईन क्र. १५/५६ आणि रिंग क्र. ४७१ जवळ ६ इंची छिद्र पडले आणि बोगद्यात मोठ्या प्रमाणात पाणी झिरपू लागले.

मेट्रोच्या ऑपरेटर भूषण बरिंगे यांच्या लक्षात पाणी साचत असल्याचे आल्यावर तातडीने नियंत्रण कक्षाला सूचना देण्यात आली. मेट्रोच्या तांत्रिक पथकाने तपासणी केली असता हे छिद्र आणि गळती आढळून आली. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन (महा-मेट्रो) ने याप्रकरणी खडक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

 पोलिस कारवाई

खडक पोलिसांनी घरमालक धनंजय मोठे आणि बोअरवेल कंत्राटदार (जगताप) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मेट्रोच्या मालमत्तेचे सुमारे २.५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे. १७ मार्चपर्यंत गळती रोखण्यात मेट्रो प्रशासनाला यश आले.

मेट्रो नियमांनुसार, मेट्रो मार्गिकेच्या परिसरात कोणतेही खोदकाम किंवा बोअरवेल करण्यासाठी विशेष परवानगी आवश्यक असते. मात्र, घरमालक आणि कंत्राटदाराने कोणतीही परवानगी न घेता हे काम केल्याचे समोर आले आहे.

महा-मेट्रोचे संयुक्त महाव्यवस्थापक शंतनू गौरात्र यांनी सांगितले की, अशा अनधिकृत खोदकामांमुळे मोठी दुर्घटना घडू शकते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनीही पुढील तपास सुरू असल्याचे सांगितले.

टीप: ही घटना अद्याप चालू असलेल्या शिवाजीनगर-स्वारगेट भूमिगत मेट्रो प्रकल्पाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करते. महा-मेट्रोने नागरिकांना मेट्रो मार्गाजवळ कोणतेही खोदकाम करण्यापूर्वी परवानगी घेण्याचे आवाहन केले आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...