⚡ ब्रेकिंग News

पुण्यातील रस्त्यांना नदीचं स्वरूप; हडपसरमध्ये पुन्हा कॅनल फुटल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी


 पुण्यातील रस्त्यांना नदीचं स्वरूप; हडपसरमध्ये पुन्हा कॅनल फुटल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी

मगरपट्टा सिटीच्या मागील गेटजवळ भिंत फुटली, रस्ता जलमय; ऐन उन्हाळ्यात वाहतुकीची कोंडी, नागरिक हैराण

पुणे: ऐन उन्हाळ्यात जिथे पाण्याचं मोठं संकट उभं आहे, तिथेच पुण्याच्या हडपसर परिसरात मध्यरात्री कॅनल फुटल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे. मगरपट्टा सिटीच्या मागील गेटजवळ, मगरपट्टा ते कोरेगाव पार्कला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावरील कॅनलची भिंत अचानक फुटली. या घटनेमुळे रस्त्यांना नदीचं स्वरूप आलं असून, मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

रस्त्यावरच पाणीच पाणी

कॅनल फुटल्यानंतर प्रचंड प्रमाणात पाणी रस्त्यावर आल्याने संपूर्ण मार्ग जलमय झाला आहे. या पाण्यामुळे मगरपट्टा सिटीमध्येही पाणी शिरल्याची माहिती समोर आली आहे. सध्या परिसरातील रस्त्यावर पाणीच पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. वाहनांची मोठी कोंडी झाल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

पाणी पुरवठा बंद

घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने कार्यवाही सुरू केली. सध्या खडकवासला धरणातून कॅनॉलमध्ये सोडण्यात येणारे पाणी बंद करण्यात आले आहे. मात्र, याआधीच मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेल्याने नासाडी झाली आहे. उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर ही घटना अधिक गंभीर ठरत असून, प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

नागरिक हैराण

रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः सकाळच्या वेळी ऑफिसमध्ये जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांनाही याचा फटका बसला आहे. पाणी साचल्याने अनेक वाहने रस्त्यावरच अडकून पडली. प्रशासनाने दुरुस्तीचे काम सुरू केले असून, लवकरात लवकर परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...