⚡ ब्रेकिंग News

नांदेड हादरलं! वाजेगावच्या पुलावर धावत्या दुचाकीचा स्फोट; तरुणाचा होरपळून मृत्यू, नमाज पठणानंतर घडली घटना

नांदेड हादरलं! वाजेगावच्या पुलावर धावत्या दुचाकीचा स्फोट; तरुणाचा होरपळून मृत्यू, नमाज पठणानंतर घडली घटना

मृतदेहाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश; स्फोटाचं कारण शोधण्यासाठी एटीएस व गुन्हे शाखेकडून तपास सुरू

नांदेड: नांदेड शहराजवळील वाजेगाव बंधाऱ्यावर  एक भीषण घटना घडली आहे. ईदनिमित्त सामूहिक नमाज पठण झाल्यानंतर वाजेगाव पुलावरून जात असलेल्या दुचाकीला अचानक स्फोट झाला. यात दुचाकीसह तरुण जळाला असून, उपचारापूर्वीच त्याचा होरपळून मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेने परिसर हादरला आहे.

मृतदेहाची ओळख पटली

पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटविण्यात यश मिळवले आहे. मात्र, या प्रकरणाबाबत कमालीची गुप्तता पोलीस विभागाकडून बाळगण्यात आली आहे. दुचाकी परभणी जिल्ह्यातील एका तरुणाची असल्याची माहिती मिळाली असून, त्यादिशेने पोलीस तपास करत आहेत.

एटीएस आणि गुन्हे शाखेकडून तपास

या स्फोटप्रकरणाचा तपास आता एटीएस (ATS) आणि गुन्हे शाखेकडून सुरू आहे. दुचाकीजवळ झालेला स्फोट हा पेट्रोल टाकीचा होता, फटाक्यांचा होता, की अन्य कुठल्या पदार्थाचा यात समावेश होता? याचा शोध फॉरेन्सिक टीम घेत आहे. घटनास्थळी मोठा पोलीस फाटा दाखल झाला असून, तपास सुरू आहे.

 दुसरी घटना (छत्रपती संभाजीनगर - प्राध्यापक लोंढे खून प्रकरण)

प्राध्यापक लोंढे खून प्रकरणात ६५ लाखांच्या लुटीचा तपास; १२ लाखांची जॅग्वार कार जप्त, उर्वरित रकमेचा हिशोब हवा

आरोपी विशाल राठोडने लुटलेल्या रकमेतून घेतली कार; अपघातात निकामी झाल्याने गॅरेजमध्ये ठेवली होती, गुन्हे शाखेकडून पुढील तपास

छत्रपती संभाजीनगर: प्राध्यापक राजाभाऊ लोंढे यांच्या हत्याकांडाच्या तपासात धक्कादायक आर्थिक बाबी समोर येत आहेत. मुख्य आरोपी विशाल राठोड याने लुटलेल्या ६५ लाख रुपयांपैकी तब्बल १२ लाख रुपये खर्च करून जुनी जॅग्वार कार खरेदी केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी ही कार जप्त केली असली तरी उर्वरित ४३ लाखांहून अधिक रकमेचा हिशेब अद्याप लागलेला नाही.

आर्थिक व्यवहारातील हत्याकांड

आर्थिक व्यवहारातून झालेल्या या हत्याकांडात हे पैसे नेमके कुठे खर्च झाले, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. आरोपीने घेतलेली कार अपघातात निकामी झाल्यानंतर दुरुस्तीसाठी कोकणवाडी येथील एका गॅरेजमध्ये ठेवली होती. गुन्हे शाखेच्या पथकाने ही कार ताब्यात घेतली आहे.

आरोपी सातत्याने देतोय गुंगारा

तपासादरम्यान आरोपी सातत्याने पोलिसांना गुंगारा देत असून समाधानकारक माहिती देत नाही. तसेच, गुन्ह्यात वापरलेला मोबाईल पुण्यात लपवून ठेवला असल्याची माहिती समोर आली असून तो जप्त करण्यासाठी पोलिसांचे पथक पुण्याकडे रवाना होणार आहे. पुढील तपास गुन्हे शाखा करत आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...