⚡ ब्रेकिंग News

एकसारखे रुद्राक्ष माळेचे गंडे, हा निव्वळ योगायोग? सुषमा अंधारेंनी रुपाली चाकणकर-सुनील तटकरेंचे फोटो पोस्ट करत पुन्हा डिवचलं


एकसारखे रुद्राक्ष माळेचे गंडे, हा निव्वळ योगायोग? सुषमा अंधारेंनी रुपाली चाकणकर-सुनील तटकरेंचे फोटो पोस्ट करत पुन्हा डिवचलं

अशोक खरात प्रकरणात नवं वळण; सुषमा अंधारे यांच्या फोटोंनंतर चर्चेला उधाण; तटकरे म्हणाले, "योग्यवेळी बोलेन"

मुंबई: नाशिकमधील स्वयंघोषित ज्योतिषी आणि कॅप्टन म्हणून मिरवणाऱ्या अशोक खरात  प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत असताना, आता या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले आहे. शिवसेना (ठाकरे गट) च्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट करत रुपाली चाकणकरयांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे  यांच्यावर निशाणा साधला आहे.

सुषमा अंधारेंची फेसबुक पोस्ट

सुषमा अंधारे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये रुपाली चाकणकर आणि सुनील तटकरे यांचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दोघांच्या हातात एकसारखी रुद्राक्षाची माळ दिसत आहे. अंधारे यांनी या माळांवर लाल रंगाने मार्क करत लिहिले, "एकसारखे रुद्राक्ष माळेचे गंडे हा निव्वळ योगायोग आहे." या पोस्टने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. अशोक खरात प्रकरणात आधीच अनेक शंका आणि चौकशीची मागणी होत असताना, या नव्या फोटोंमुळे राजकीय आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे.

रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर नवा ट्विस्ट

अशोक खरातच्या पाद्यपूजेचे फोटो समोर आल्यानंतर रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर सुनील तटकरे यांच्याशी असलेल्या संबंधांवरूनही चर्चा सुरू झाली. सुषमा अंधारे यांच्या या पोस्टमुळे ही चर्चा आणखी तीव्र झाली आहे.

तटकरेंची प्रतिक्रिया: "योग्यवेळी बोलेन"

दरम्यान, महाड येथील एका कार्यक्रमानंतर माध्यमांनी सुनील तटकरे यांना रुपाली चाकणकर यांच्याशी असलेल्या संबंधांबाबत प्रश्न विचारला. यावेळी तटकरे चांगलेच संतापले. ते म्हणाले, "ही जागा बोलायची नाही. मी योग्यवेळी बोलेन. मला घटनेने अधिकार दिला आहे, मला ज्यावेळी बोलायचं आहे, त्यावेळी बोलेन." असे म्हणत ते तेथून निघून गेले. त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे या प्रकरणातील उत्सुकता आणखी वाढली आहे.

अशोक खरात प्रकरणाचा राजकीय रंग

सध्या अशोक खरात प्रकरणात विशेष तपास पथकाकडून (SIT) चौकशी सुरू आहे. लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणुकीच्या आरोपांमुळे आधीच खळबळ उडालेल्या या प्रकरणात आता राजकारण चांगलेच तापले आहे. सुषमा अंधारेंच्या या पोस्टनंतर आगामी काळात या प्रकरणाला आणखी राजकीय वळण मिळण्याची शक्यता आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...