⚡ ब्रेकिंग News

तक्रार करणाऱ्यावरच शिक्षेचा बडगा! सहावीच्या मुलींकडून दहावीचा पेपर तपासणाऱ्या शिक्षकावर नव्हे, तर प्रकरण उघडकीस आणणाऱ्या कर्मचाऱ्यावरच निलंबनाची कारवाई

तक्रार करणाऱ्यावरच शिक्षेचा बडगा! सहावीच्या मुलींकडून दहावीचा पेपर तपासणाऱ्या शिक्षकावर नव्हे, तर प्रकरण उघडकीस आणणाऱ्या कर्मचाऱ्यावरच निलंबनाची कारवाई

फलटणच्या उत्तरेश्वर हायस्कूलमधील धक्कादायक प्रकाराने शिक्षण व्यवस्थेतच खळबळ उडवून दिली आहे.

फलटण (जि. सातारा) येथील एका शाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका सहावीतील विद्यार्थिनींकडून तपासण्याचा प्रकार समोर आल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आणणाऱ्या कर्मचाऱ्यावरच निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार करणाऱ्या शाळेच्या कर्मचाऱ्यालाच शिक्षेचा सामना करावा लागला आहे.

सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील विडणी येथील उत्तरेश्वर हायस्कूलमध्ये हा प्रकार घडला होता. या शाळेत एका शिक्षकाने सहावीतील विद्यार्थिनींच्या मदतीने दहावीच्या मराठी विषयाच्या उत्तरपत्रिका तपासल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, या प्रकरणाची तक्रार शिक्षणाधिकाऱ्यांकडे केल्याच्या कारणावरून शाळेच्या शिपाई पदावर कार्यरत असलेल्या मंगेश अभंग यांना चार महिन्यांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

संस्थेचे स्पष्टीकरण:

संस्थेने दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, शिक्षक वैभव शेंडे हे उत्तरपत्रिका तपासणीचे काम करत असताना त्यांनी सहावीच्या मुलींना फक्त रेषा मारण्याचे काम दिले होते. मात्र, मंगेश अभंग यांनी मुख्याध्यापकांची परवानगी न घेता याचा व्हिडीओ काढून माध्यमांना दिशाभूल करणारी माहिती दिली. यामुळे शाळेची बदनामी झाल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

तक्रारदाराचे म्हणणे:

निलंबित करण्यात आलेले मंगेश अभंग यांनी या कारवाईला नकार देताना सांगितले की, २६ फेब्रुवारी रोजी मराठीचा पेपर सहावीच्या विद्यार्थिनींकडून तपासला जात होता आणि हा प्रकार सलग दोन दिवस चालला होता. त्यांनी ही माहिती संस्थेच्या सचिवांच्या कानावर घातली. मात्र, त्यानंतर ज्या शिक्षकांविरोधात तक्रार केली, त्यांच्याकडून त्यांना दमदाटी करण्यात आली. यानंतर त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. याचा परिणाम म्हणून संस्थेने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून आता निलंबनाची कारवाई केली आहे.

अभंग यांनी पुढे आरोप केला की, “ज्या शिक्षकाने हा प्रकार केला, त्याच्याविरोधात कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. संस्थेच्या सचिवांचा मुलगा दहावीत असल्याने त्याला मदत व्हावी यासाठी शिक्षकाकडून ही भूमिका घेतली गेली असावी. त्यामुळे माझ्यावर कारवाई करण्यात आली आहे.” अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...