⚡ ब्रेकिंग News

इराणनं फक्त या ५ शस्त्रांनी युद्धखोर इस्त्रायल आणि महाशक्ती अमेरिकेला गुडघ्यावर आणलं; २८ दिवसांच्या युद्धातही ट्रम्प-नेतन्याहू चक्रव्यूहात अडकले!

फताह हायपरसॉनिकपासून शाहेद ड्रोनपर्यंत; इराणची प्राणघातक शस्त्रे अमेरिका-इस्रायलच्या संरक्षण यंत्रणेला देत आहेत सतत आव्हान

तेहरान/जेरुसलेम: अमेरिका आणि इस्रायलकडून २८ दिवसांपासून सातत्याने होणाऱ्या जोरदार हल्ल्यांनंतरही इराणने आपल्या पाच प्राणघातक शस्त्रांच्या बळावर शत्रूला मोठे आव्हान दिले आहे. ही शस्त्रे इतकी वेगवान, स्वस्त आणि रडारला चकमा देणारी आहेत की, अमेरिका-इस्रायलची अत्याधुनिक संरक्षण प्रणालीही त्यांना पूर्णपणे रोखू शकत नाही. फेब्रुवारीच्या अखेरीस सुरू झालेल्या या संघर्षात हजारो क्षेपणास्त्र प्रक्षेपक, कारखाने आणि लष्करी तळ नष्ट झाले तरी इराणची ही प्रमुख शस्त्रे अद्याप कार्यरत आहेत.

इराणची ही शस्त्रे केवळ वेगवान नाहीत तर लपवायलाही सोपी आहेत. स्वस्त ड्रोनपासून ते हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांपर्यंत, इराण शत्रूच्या संरक्षणात घुसून युद्ध सुरू ठेवत आहे.

इराणची ५ अभेद्य शस्त्रे जी अमेरिका-इस्रायलसाठी डोकेदुखी ठरली आहेत:

1. फताह हायपरसॉनिक क्षेपणास्त्र  

   जगातील सर्वात वेगवान क्षेपणास्त्रांपैकी एक. वेग: ताशी सुमारे १८,५२२ किमी (मॅक १५).  

   वैशिष्ट्य: सरळ रेषेत न जाता हवेत दिशा बदलू शकते. इस्रायलची ‘आयरन डोम’ आणि अमेरिकेची ‘पॅट्रियट’ यंत्रणेला चकमा देते. जमिनीखालील बंकरमध्ये सुरक्षित ठेवली जाते.

2. शाहेद-१३६ ड्रोन  ‘कामीकाझे’ ड्रोन)

   अत्यंत स्वस्त पण अत्यंत प्रभावी ‘सुसाईड ड्रोन’.  

   रणनीती: मोठ्या थव्याने  डागले जाते. शत्रूची महागडी संरक्षण यंत्रणा या स्वस्त ड्रोन्सना रोखण्यात खर्च करते, त्यामुळे मुख्य क्षेपणास्त्रे लक्ष्यापर्यंत सहज पोहोचतात.

3. जोल्फगार बॅलिस्टिक क्षेपणास्त्र 

   पल्ला: सुमारे ७०० किमी.  

   वैशिष्ट्य: क्लस्टर वॉरहेड्स वाहून नेऊ शकते, एकाच वेळी मोठ्या क्षेत्रावर संहार करू शकते. रडारला चकमा देण्यात तरबेज. अमेरिका-इस्रायलच्या संरक्षण यंत्रणेसाठी मोठे आव्हान.

4. शाहाब-३ 

   इराणचा ‘कणा’ मानला जाणारा मध्यम पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र.  

   पल्ला: २००० किमी पर्यंत. संपूर्ण इस्रायल आणि आखातातील अमेरिकेचे लष्करी तळ याच्या टप्प्यात.  

   मोबाइल लाँचर्सवरून डागता येते, म्हणून शत्रूच्या विमानांना शोधणे कठीण.

5. खोर्रमशहर-४ 

   इराणचे सर्वात प्रगत क्षेपणास्त्र. १५०० किलोपर्यंत स्फोटके वाहून नेऊ शकते.  

   वैशिष्ट्य: ‘सायबर सुरक्षा’ तंत्रज्ञानामुळे शत्रूचे जॅमर्स याला हवेत निकामी करू शकत नाहीत.

या शस्त्रांच्या बळावर इराण २८ दिवसांनंतरही युद्ध सुरू ठेवत आहे. अमेरिका आणि इस्रायलने मोठ्या प्रमाणात हल्ले केले असले तरी इराणची ही शस्त्रे अद्याप शत्रूला सतत त्रास देत आहेत. या संघर्षात ट्रम्प आणि नेतन्याहू यांना अद्याप इराणी चक्रव्यूहातून बाहेर पडता आलेले नाही.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...