⚡ ब्रेकिंग News

एकीच्या काळजात ज्वाला सुडाची, दुसरीच्या मनात ज्योत प्रेमाची; ‘दीपज्योती’सह झी मराठीवर येतेय नवीन मालिका


प्रेम आणि सुडाच्या गुंतागुंतीच्या भावनांवर आधारित ‘दीपज्योती’; प्रसाद जवादे आणि पूर्वा कौशिक पुन्हा एकत्र, १३ एप्रिलपासून सुरू

मुंबई: झी मराठीवरील प्रेक्षकांच्या आवडत्या मालिका ‘पारू’ अचानक बंद झाल्यानंतर आता वाहिनीवर एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘दीपज्योती’ या नव्या मालिकेच्या माध्यमातून प्रेम, आपुलकी, सुड आणि नात्यांच्या गुंतागुंतीची हृदयस्पर्शी कहाणी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ही मालिका येत्या १३ एप्रिल २०२६ पासून झी मराठीवर सुरू होणार आहे.

मालिकेची कहाणी आहे ज्योती या मुलीची, जिच्या कुटुंबात प्रेम आणि आपुलकीने बांधलेले बहीण-भावांचे नाते आहे. ज्योतीचे वडील दारूच्या आहारी गेल्याने संपूर्ण जबाबदारी तिच्या मोठ्या भावावर (अभिजीत) पडली. लहान वयातच शिक्षण सोडून कुटुंबाची जबाबदारी स्वीकारावी लागलेल्या अभिजीतसोबत घरात आनंदाचे वातावरण आहे. ज्योतीला शिकून चांगली नोकरी करण्याची स्वप्ने आहेत.

दुसरीकडे, एक श्रीमंत आणि घरंदाज कुटुंब आहे ज्याचे प्रमुख पुरुषोत्तम. त्यांची तीन मुलं - स्वराज, दीप आणि विराज. स्वराज वडिलांचा बिझनेस पुढे नेण्यासाठी उत्सुक आहे, तर विराज आपल्या नोकरीत समाधानी आहे. मात्र दीपचा वडिलांशी खूप राग आणि दुरावा आहे. आईच्या मृत्यूला पुरुषोत्तम दीपला जबाबदार मानतात आणि त्यांचा तिरस्कार करतात. आई गेल्यानंतर दीप दारूच्या आहारी गेला आहे.

मालिकेची कहाणी एका धक्कादायक घटनेने सुरू होते, ज्यात एका क्षणात आनंदाला दुःखाचे ग्रहण लागते. त्यानंतर दीप आणि ज्योती यांचा भेटीचा प्रवास आणि त्यांच्या नात्याची गुंतागुंत प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी ठरेल.

मुख्य भूमिकेत परिचित चेहरे

मालिकेत दीपची भूमिका प्रसाद जवादे साकारणार आहेत, तर ज्योतीची भूमिका पूर्वा कौशिक करणार आहेत. दोघेही ‘पारू’ मालिकेनंतर पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. याशिवाय डॉ. गिरीश ओक आणि सुहास परांजपे यांच्यासारख्या अनुभवी कलाकारांचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

मालिकेचे लेखन अश्विनी अनगळ आणि सायली कुलकर्णी यांनी केले आहे. संवाद लेखन इरफान मुजावर यांचे आहे तर दिग्दर्शन अमित सावर्डेकर यांनी केले आहे.

प्रेम, सुड, कुटुंब आणि नात्यांच्या भावनिक घडामोडींनी भरलेली ‘दीपज्योती’ मालिका १३ एप्रिलपासून रोज झी मराठीवर पाहता येणार आहे. प्रेक्षकांना ही नवी मालिका किती आवडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...