३१ मार्चला जाहिरात, नोंदणी लवकरच; ३२ लाख ते ८ कोटीपर्यंत किंमती, सर्वाधिक घरे मध्यम आणि उच्च गटासाठी; A to Z महत्त्वाची माहिती
मुंबई: स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुंबईकरांसाठी मोठी बातमी आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) मुंबई मंडळ येत्या काही दिवसांत मुंबईतील तब्बल २५०० घरांसाठी लॉटरी काढणार आहे. विक्रोळी, पहाडी गोरेगाव, पवई, जुहू, ताडदेव, बोरिवली आणि पंतनगर या भागांमध्ये ही घरे उपलब्ध असणार आहेत.
म्हाडा मुंबई मंडळाकडून यंदा सर्वाधिक घरे मध्यम उत्पन्न गट (MIG) आणि उच्च उत्पन्न गट (HIG) साठी असणार आहेत. पहाडी गोरेगाव येथील पीएमएवाय अंतर्गत फक्त १० घरे सर्वसामान्यांसाठी उपलब्ध असतील, ज्यांची किंमत अंदाजे ३२ लाख रुपये आहे. उर्वरित बहुतेक घरांच्या किंमती कोटींच्या घरात आहेत.
महत्त्वाच्या ठिकाणी किती घरे?
विक्रोळी कन्नमवार नगर : १२०० घरे (अंदाजे ८० लाख रुपये, ८०० चौ. फूट)
पहाडी गोरेगाव : पीएमएवाय अंतर्गत १० घरे (३२ लाख)
पवई, जुहू, ताडदेव, बोरिवली, पंतनगर : मध्यम आणि उच्च गटातील घरे
नोंदणी आणि लॉटरी प्रक्रिया
जाहिरात प्रसिद्धी: ३१ मार्च २०२६ रोजी
नोंदणी प्रक्रिया: जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर लवकरच सुरू होणार
घरांच्या किंमती: ३२ लाख ते ८ कोटी रुपयांपर्यंत
अर्ज करण्यासाठी आवश्यक पात्रता (मागील लॉटरीप्रमाणे)
अर्जदाराचे वय किमान १८ वर्षे असावे.
विवाहित असल्यास पती/पत्नीचे आधार कार्ड किंवा पॅन कार्ड आवश्यक.
अविवाहित असल्यास स्वतःचे आधार/पॅन कार्ड.
महाराष्ट्रातील अधिवास प्रमाणपत्र जानेवारी २०१८ नंतरचे आणि बारकोड असलेले असावे.
मागील २० वर्षांपैकी किमान १५ वर्षे महाराष्ट्रात सलग वास्तव्य असावे.
म्हाडा ही लॉटरी संगणकीय पद्धतीने विविध उत्पन्न गटातील अर्जदारांच्या यादीनुसार काढणार आहे. यंदा घरांच्या किंमती जास्त असल्याने सर्वसामान्य नागरिकांना घर मिळणे आव्हानात्मक ठरू शकते, अशी चर्चा आहे.
म्हाडाने आतापर्यंत राज्यात ५.२७ लाख घरे बांधली आहेत. मुंबई मंडळासोबत पुणे, कोकण, नाशिक, संभाजीनगर आदी मंडळेही वेगवेगळ्या लॉटरी काढतात.
टीप: अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर नोंदणी, अर्ज फी, आवश्यक कागदपत्रे आणि इतर नियमांबाबत सविस्तर माहिती म्हाडाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध होईल. इच्छुक नागरिकांनी अधिकृत सूचना जाहीर होण्याची वाट पाहावी आणि फक्त अधिकृत वेबसाइटवरून अर्ज करावा.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.