⚡ ब्रेकिंग News

जय पवारांवर प्रफुल पटेल आणि तटकरेंचा दबाव? पत्रकार परिषद रोखल्याचा रोहित पवारांचा आरोप; तटकरेंनी दिली रोखठोक उत्तरं


   “मी आणि प्रफुल्ल पटेल यांनी जय पवारांना पत्रकार परिषद घेण्यापासून रोखले नाही” - सुनील तटकरे

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या चिरंजीव जय पवार यांची पत्रकार परिषद प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या दबावामुळे रोखण्यात आल्याचा आरोप केला होता. या आरोपावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज रोखठोक उत्तर दिले आहे.

सुनील तटकरे म्हणाले, “हा अत्यंत कपोलकल्पित आणि निराधार आरोप आहे. मी २८ मार्चला अजितदादांच्या निधनाला एक महिना पूर्ण झाल्याच्या दिवशी पार्थ आणि जय पवार यांच्यासोबत बारामतीत गेलो होतो. अपघातस्थळी भेट दिली आणि नंतर काटेवाडी येथे अजित पवारांच्या आईंना भेटलो. त्यानंतर पार्थ आणि जय यांच्याशी चर्चा झाली. त्यांना पत्रकार परिषद घेण्याचा सल्ला मीच दिला होता. जय पवार यांनी ट्विट करून तारखाही जाहीर केल्या होत्या. मात्र, त्या तारखा पार्थ पवार यांच्याशी चर्चा करून बदलण्यात आल्या.”

तटकरे पुढे म्हणाले, “पत्रकार परिषद घ्यावी, असे मी जय पवार यांना सांगितले आहे. पण ती कधी घ्यायची, हा निर्णय जय आणि पार्थ यांचाच आहे. कोणीतरी याबाबत बोलले पाहिजे, ही आमची सर्वांची भावना आहे. केवळ पूर्वग्रहदुषित पद्धतीने आरोप करणे योग्य नाही. पक्ष जय आणि पार्थ यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे.”

दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणावर तटकरेंची स्पष्ट भूमिका

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाबाबत भाजपकडून दबाव असल्याचा प्रश्न विचारला असता तटकरे म्हणाले, “भाजपकडून कधीही दबाव नव्हता. आम्ही अजितदादांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये सामील झालो तेव्हा पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केले. भाजपने आमच्या पक्षाच्या आंतरबाबतीत कधीही हस्तक्षेप केलेला नाही.”

विलीनीकरणाबाबत ते म्हणाले, “या विषयावर निर्णय घेण्याचा अधिकार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (वहिनी) यांच्याकडे आहे. सध्याच्या क्षणी माझ्याकडे याबाबत कोणतीही माहिती नाही. मी दीर्घकाळ पक्षाचा अध्यक्ष राहिलो, पण विलीनीकरण हा पूर्णपणे वेगळा विषय आहे. त्यामुळे या विषयावर सध्या मी अधिक बोलणार नाही.”

सुनील तटकरे यांच्या या स्पष्ट आणि रोखठोक उत्तराने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. जय पवार यांची पत्रकार परिषद कधी होणार आणि दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया पुढे कशी जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...