“दीपक केसरकर एकनाथ शिंदेंना खरातकडे घेऊन गेले, ट्रायडंट हॉटेलमध्ये बदल्या-बडतर्फी खरातच्या नेतृत्वात” - संजय राऊत
मुंबई: शिवसेना (ठाकरे गट)चे खासदार संजय राऊत यांनी नाशिकमधील भोंदू बाबा म्हणून चर्चेत असलेल्या अशोक खरात यांच्या संपत्ती आणि राजकीय संबंधांबाबत सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
संजय राऊत म्हणाले, “अशोक खरात हा सरकारचाच माणूस आहे. त्याच्या पाठीशी ४० आमदार आहेत. त्याच्या संपत्तीबाबत सरकारने उत्तर द्यायला हवे. छगन भुजबळ गॅस टंचाईची चर्चा करतात आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्व काही ठीक आहे असे सांगतात. सर्वप्रथम लॉकडाउन होणार हे गुजरातच्या लोकांना समजले आणि तेथे गॅससाठी सर्वात मोठ्या रांगा लागल्या.”
राऊत यांनी पुढे जोरदार हल्लाबोल करताना म्हटले की, “अशोक खरात भोंदू बाबा तर आहेच, पण दीपक केसरकर आणि एकनाथ शिंदे यांना चौकशीसाठी बोलवा. खासदार सुनील तटकरे, रुपाली चाकणकर यांचीही चौकशी करा. अमित शाह यांच्यापर्यंत अशोक खरात कसा पोहोचला, याची चौकशी व्हायला हवी.”
महाविकास आघाडी सरकारवरही टीका
संजय राऊत म्हणाले, “महाविकास आघाडी सरकारमध्ये पाणी देणे चुकीचे होते. पण गुन्हा कधी झाला? आता सरकार कोणाचे आहे? जयंत पाटील यांनी पाणी दिले तर ते चुकीचे का? महत्वाचे आहे की महिलांचा शोषण झाला आहे की नाही, हे महत्वाचे आहे.”
ते पुढे म्हणाले, “एकनाथ शिंदे यांना अशोक खरात यांच्याकडे नेणारे दीपक केसरकर होते. ट्रायडंट हॉटेलमध्ये आणि शिक्षण खात्यात सर्व बदल्या-बडतर्फी अशोक खरात यांच्या नेतृत्वात होत्या.”
अशोक खरात आज न्यायालयात
दरम्यान, अशोक खरात यांची आज नाशिक जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यांची पोलीस कोठडी आज संपत आहे. नव्याने दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या तपासासाठी सरकारी पक्षाकडून कोठडी वाढवण्याची मागणी केली जाण्याची शक्यता आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.