⚡ ब्रेकिंग News

अशोक खरात प्रकरणी अतुल कुलकर्णींची सरबत्ती; 'फक्त पकडल्यावर भोंदू, त्यापूर्वी ते कोण असतात?' प्रश्नांची झोड

अशोक खरात प्रकरणी अतुल कुलकर्णींची सरबत्ती; 'फक्त पकडल्यावर भोंदू, त्यापूर्वी ते कोण असतात?' प्रश्नांची झोड

'अंधश्रद्धा, राजकारण, धर्मकारण... या सगळ्याला किती लागू होतो हा प्रश्न?'; भोंदूबाबाच्या आर्थिक फसवणुकीचंही मोठं जाळं उघड

महिलांच्या अंधश्रद्धेचा फायदा घेऊन लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरात  या भोंदूबाबाचे अनेक कारनामे आता समोर येऊ लागले आहेत. या प्रकरणी अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ माजली असून सर्वच स्तरांतून संताप व्यक्त केला जात आहे. अशातच आता मराठी अभिनेते अतुल कुलकर्णी  यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत प्रश्नांची सरबत्ती केली आहे. 'फक्त पकडले गेले कीच आणि तरच भोंदू? त्यापूर्वी ते कोण असतात? जे कधी पकडलेच जात नाहीत ते?' असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

अतुल कुलकर्णी नेमकं काय म्हणाले?

अतुल कुलकर्णी यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये अनेक महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले:

"पकडले गेले कीच आणि तरच 'भोंदू'? त्या आधी ते काय असतात? आणि जे कधी पकडलेच जात नाहीत ते?"

ते पुढे म्हणाले, "ज्या वेळी कुणी 'महाराज' भोंदू 'निघतात, तेंव्हा त्यांचे भक्तं नेमके कोण होतात- भागीदार, पिडीत, अंधळे, अंधश्रद्धाळू, कमनशिबी, भाबडे, मूर्ख की आणखी कुणी?"

डोळस आणि अंध श्रद्धेत किती अंतर?

अतुल कुलकर्णी यांनी श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या संकल्पनेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले:

"श्रद्धा, अंध कधी होते? डोळस श्रद्धा म्हणजे काय? डोळस आणि अंध श्रद्धांमधे अंतर किती असतं? अंध होण्याला कारणीभूत कोण असतं? करणारे की होणारे? अंधळं होणाऱ्यांवर त्याची काही जबाबदारी असते की नसते?"

धर्मकारण आणि राजकारणालाही लागू होतो का?

अभिनेत्याने आपल्या प्रश्नांची सांगता करताना एक महत्त्वाची बाजू मांडली. ते म्हणाले:

"हे सगळं जितकं धर्मकारणाला लागू होतं (कुठल्याही धर्माच्या) तितकंच ते राजकारणालाही लागू होतं का (कुठल्याही पक्षाच्या)?"

अशोक खरातचं आर्थिक फसवणुकीचंही मोठं जाळं

दरम्यान, अशोक खरातच्या लैंगिक अत्याचार प्रकरणात आता आणखी धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. धार्मिक विधी, अंधश्रद्धा आणि भीती यांचा आधार घेत खरातने केवळ महिलांचे शोषणच नाही, तर आर्थिक फसवणुकीचंही मोठं जाळं उभं केलं होतं, अशी माहिती तपासातून उघड झाली आहे.

  • आर्थिक गुंतवणूक: खरातनं पाथर्डी गवळाणं, सिन्नर, शिर्डी, ओझर परिसरात कोट्यवधींची गुंतवणूक केल्याची माहिती आहे.

  • एसआयटी चौकशी: प्रकरणाची एसआयटी चौकशीला वेग आला असून डिजिटल आणि फॉरेन्सिकच्या आधारे तपास सुरू आहे.

  • तांत्रिक पुरावे: फोन कॉल तपासण्यासह तांत्रिक पुरावे गोळा करण्याचं काम सुरू झालं आहे.

  • नेटवर्क तपास: आर्थिक व्यवहार, खरातचं नेटवर्क तसंच सहकारी आरोपींचा शोध घेतला जाणार आहे.

अशोक खरात प्रकरणाचे धक्कादायक खुलासे

अशोक खरातच्या अत्याचाराचे ५८ व्हिडीओ आतापर्यंत पोलिसांना सापडले आहेत. पोलिसांकडे तक्रार करणारी महिला एकमेव नसून अशा अनेक महिलांचं त्यानं शोषण केल्याचं समोर येत आहे. या प्रकरणाने अख्खं राजकारण ढवळून काढले असून, सर्वच स्तरांतून संताप व्यक्त केला जात आहे.


Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...