⚡ ब्रेकिंग News

'धुरंधर २' नाकारल्याच्या चर्चेवर अनिल कपूर म्हणाले, "दाऊदशी जवळीक नव्हे तर..." स्वतःच सांगितलं कारण


'धुरंधर २' नाकारल्याच्या चर्चेवर अनिल कपूर म्हणाले, "दाऊदशी जवळीक नव्हे तर..." स्वतःच सांगितलं कारण

दाऊद इब्राहिमसोबतचा व्हायरल फोटो, 'गँग ऑफ लायरी'त सामील होण्याची ऑफर; अनिल कपूर यांची मुलाखत, प्रोफेशनलिझमचं कारण सांगत केला खुलासा

नुकत्याच रिलीज झालेल्या 'धुरंधर २' ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. आदित्य धर दिग्दर्शित या सिनेमानं पहिल्याच दिवशी कोटींची कमाई करत भल्या भल्या दिग्गजांना गुडघे टेकायला भाग पाडले. अशातच या सिनेमाशी निगडित अनेक किस्से सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यातच अभिनेते अनिल कपूर  यांनी हा सुपरहिट सिनेमा का नाकारला, याबाबत स्वतः खुलासा केला आहे. दरम्यान, दाऊद इब्राहिम  यांच्याशी जवळीक असल्याने त्यांनी हा सिनेमा नाकारल्याची चर्चाही सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

अनिल कपूर यांनी स्वतः सांगितलं कारण

इंडिया टुडेच्या एका कार्यक्रमात राजदीप सरदेसाई यांनी अनिल कपूर यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांना विचारण्यात आले की, "जर आदित्य धर तुमच्याकडे आले आणि म्हणाले की, ते 'धुरंधर ३' बनवत आहेत, आणि तुम्हालाही त्यांनी त्यांच्या लायरीच्या टोळीत  सामील होण्यासाठी विचारलं, तर तुम्ही तो सिनेमा कराल का?"

यावर अनिल कपूर यांनी उत्तर देताना सांगितले की, "आदित्य धर माझ्याकडे 'धुरंधर २'साठीच आले होते. त्यांची इच्छा होती की, मी फिल्ममध्ये कॅमिओ करावा. आज मी जे काही आहे, त्याचं कारण माझं प्रोफेशनलिझम आहे. फक्त टॅलेंटच्या जोरावर तुम्ही इथे पोहोचू शकत नाही."

ते पुढे म्हणाले, "ज्यावेळी मला विचारणा झाली, त्यावेळी मी दुसऱ्या फिल्मसोबत कमिटेड होतो. ती फिल्म लवकरच रिलीज होणार आहे आणि तीसुद्धा खूप छान फिल्म आहे. 'धुरंधर २' नाकारणं हे माझं नुकसान आहे, पण ठीक आहे."

दाऊदशी जवळीक असल्याने नाकारल्याची चर्चा

अनिल कपूर यांचे हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांचा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसोबतचा एक जुना फोटोही व्हायरल होऊ लागला. हा फोटो एका पब्लिक इव्हेंटचा असून, त्यात अनिल कपूर दाऊद इब्राहिमच्या बाजूला उभे आहेत.

या फोटोनंतर सोशल मीडियावर वेगवेगळे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. अनेकांनी दाऊद इब्राहिमशी असलेल्या जवळीकीमुळेच अनिल कपूर यांनी 'धुरंधर २' नाकारला असावा, असा दावा केला आहे. १९९० च्या दशकात दाऊद इब्राहिमचा बॉलिवूडवर मोठा प्रभाव होता. सिनेसृष्टीत दाऊदच्या संमतीशिवाय साधं पानंही हलत नव्हतं, असे अनेक किस्से सांगितले जातात.

'धुरंधर २'ची यशोगाथा

दिग्दर्शक आदित्य धर यांचा 'धुरंधर २' हा सिनेमा रणवीर सिंह  स्टारर असून, पहिल्या आठवड्यात त्यानं बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. पहिल्याच दिवशी कोटींच्या कोटी उड्डाणं घेत, भल्या भल्या दिग्गजांना आपल्यासमोर गुडघे टेकायला भाग पाडलं. अगदी बॉक्स ऑफिसपासून सोशल मीडियापर्यंत आदित्य धर आणि रणवीर सिंह यांचा 'धुरंधर २' धुमाकूळ घालत आहे.


Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...