⚡ ब्रेकिंग News

सातारा एसपी निलंबनावरून सत्ताधाऱ्यांमध्येच आरोप-प्रत्यारोप; नीलम गोऱ्हेंचे तत्काळ निलंबनाचे निर्देश, जयकुमार गोरेंचा कडाडून विरोध


 सातारा एसपी निलंबनावरून सत्ताधाऱ्यांमध्येच आरोप-प्रत्यारोप; नीलम गोऱ्हेंचे तत्काळ निलंबनाचे निर्देश, जयकुमार गोरेंचा कडाडून विरोध

'वस्तुस्थिती जाणून न घेता आयपीएस अधिकाऱ्याचे निलंबन कसे?'; 'मंत्र्याला पोलिसांनी मारहाण केल्याचा इतिहासातील पहिला प्रकार'; विधानपरिषदेत शिवसेना-भाजप आमने-सामने

सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत  झालेल्या अभूतपूर्व गोंधळाची विधानपरिषद सभापती नीलम गोऱ्हे  यांनी गंभीर दखल घेतली. त्यांनी सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या तत्काळ निलंबनाचे आदेश दिले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी पुण्याच्या विभागीय आयुक्तांना करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, या निर्णयाला मंत्री जयकुमार गोरे यांनी कडाडून विरोध केल्याने सत्ताधाऱ्यांमध्येच आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या.

जयकुमार गोरे यांचा विरोध

मंत्री जयकुमार गोरे यांनी सभापती नीलम गोऱ्हे यांच्या निर्णयाला आक्षेप नोंदवत म्हटले की, "सभापती महोदया, तुम्ही निर्देश देण्यापूर्वी वस्तुस्थिती जाणून घेणे गरजेचे होते. ज्याचं अपहरण झालं तो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी अपहरणाचा गुन्हा नोंद केला होता. कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याचे काम कुणी केले? चार हजार लोक जिल्हा परिषदेत घुसले ते कुणी आणले? याचे उत्तर द्यायला हवे."

जयकुमार गोरे पुढे म्हणाले, "सभापती महोदया, तुम्ही कोणत्या प्रकारे वस्तुस्थिती जाणून न घेता एका आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्याला निलंबित करता कसं काय? तुमच्या निर्णयावर हरकत नाही. मात्र, जो निर्णय झाला आहे तो चुकीचा आहे. कार्यकर्ते कोणी आणले? भाजपवर कसं काय आरोप करता? तिथे जबरदस्ती सीइओ यांना बैठक कोणी घ्यायला लावली?"

नीलम गोऱ्हे यांची भूमिका

जयकुमार गोरे यांनी आपले म्हणणे मांडण्याचा प्रयत्न केला असता, सभापती नीलम गोऱ्हे यांनी त्यांना प्रश्न विचारत म्हटले, "सभागृहात पोलीस घुसले होते की नव्हते ते तुम्ही सांगा?" यानंतर सभागृहातील वातावरण तापले.

शंभूराज देसाई यांचा सवाल

पालकमंत्री शंभूराज देसाई  यांनी यावेळी भावनिक भूमिका मांडत म्हटले, "सभागृहात सांगण्यात आलं की मंत्री जखमी झाला आहे. एवढी परिस्थिती निर्माण झाली होती म्हणून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. माझ्या अंगावर पूर्णपणे रक्त पडलं. मंत्र्याला मारहाण झालेली तुम्ही कधी ऐकले आहे का? सभापती तुम्ही सांगा. आम्ही तुमच्या समोर नतमस्तक होतो आणि इथून निघून जातो. राज्याच्या इतिहासात आतापर्यंत कधीही मंत्र्याला पोलिसांनी मारहाण केली असं कधी ऐकलं आहे का?"

सत्ताधारी पक्षातच जुंपली

नीलम गोऱ्हे यांच्या निर्णयानंतर विधानपरिषदेत सत्ताधारी पक्षातच जोरदार जुंपल्याचे पाहायला मिळाले. शिवसेना-राष्ट्रवादीच्या आमदारांनी घोषणाबाजी करत निवडणुकीला स्थगिती देण्याची मागणी केली. तर, जयकुमार गोरे यांनी आयपीएस अधिकाऱ्याचे निलंबन रद्द करण्याची मागणी केली.

दरम्यान, उदय सामंत यांनी स्पष्ट केले की, "आम्ही कुठेही भाजपचे नाव घेतलेले नाही. त्यामुळे चुकीचे पटलावरून काढून टाका." तर, शंभूराज देसाई म्हणाले की, सभागृहात उपस्थित असताना नीलम गोऱ्हे यांनी आमची बाजू समजून घेतली.

साताऱ्यात नेमकं काय झालं?

एकूण जागा: ६५, बहुमतासाठी ३३ जागा आवश्यक

 शिवसेना-राष्ट्रवादी युतीकडे ३५ जागा (बहुमत)

भाजपकडे २७ जागा (सर्वात मोठा पक्ष)

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काय झाले?

 भाजपने शिवसेनेचे २, राष्ट्रवादीचे ३ आणि १ अपक्ष असे एकूण ६ सदस्य फोडले

 भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली

पालकमंत्री शंभूराज देसाई जखमी झाले

 मंत्री मकरंद पाटील यांना २०-२५ पोलिसांनी घेरल्याची घटना घडली

 इतर दोन सदस्यांना पोलिसांनी मतदानापासून रोखल्याचा शिवसेनेचा आरोप

प्रमुख मुद्दे 

नीलम गोऱ्हेंचे आदेश: सातारा एसपींचे तत्काळ निलंबन, विभागीय आयुक्तांकडून चौकशी

जयकुमार गोरेंचा विरोध: 'वस्तुस्थिती जाणून न घेतल्याने आदेश चुकीचे', निलंबन रद्द करण्याची मागणी

शंभूराज देसाईंची भूमिका: 'इतिहासात पहिल्यांदाच मंत्र्याला पोलिसांनी मारहाण केली'

सत्ताधाऱ्यांमध्येच तणाव: विधानपरिषदेत शिवसेना-राष्ट्रवादी आणि भाजप आमने-सामने

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...