एनएसईच्या आयपीओसाठी देश-विदेशातील दिग्गज कंपन्यांची फौज; २० मर्चंट बँकर्सची निवड
कोटक, एक्सिस, मॉर्गन स्टॅनली, जेपी मॉर्गनसह आंतरराष्ट्रीय बँकांचा समावेश; सिरिल अमरचंद, खेतान यांसारख्या आठ कायदेविषयक फर्म्सची नियुक्ती
मुंबई: नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या (एनएसई) प्रस्तावित प्राथमिक समभाग विक्रीसाठी (आयपीओ) देश-विदेशातील आघाडीच्या वित्तीय आणि कायदेविषयक कंपन्यांची फौज सज्ज झाली आहे. एनएसईने आयपीओ प्रक्रियेसाठी मर्चंट बँकर्स, कायदेविषयक सल्लागार आणि इतर मध्यस्थांची निवड प्रक्रिया पूर्ण केली आहे. ही निवड प्रक्रिया पारदर्शक आणि स्पर्धात्मक पद्धतीने पार पडल्याची माहिती एनएसईने दिली आहे.
२० मर्चंट बँकर्सची निवड
आयपीओ प्रक्रियेसाठी एकूण २० मर्चंट बँकर्सची निवड करण्यात आली आहे. यामध्ये भारतातील कोटक महिंद्रा कॅपिटल, जेएम फायनान्शियल, एक्सिस कॅपिटल, आयआयएफएल कॅपिटल सर्व्हिसेस, मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझर्स, आयसीआयसीआय सिक्युरिटीज, एसबीआय कॅपिटल मार्केट्स, नुवामा वेल्थ मॅनेजमेंट आणि एचडीएफसी बँक या आघाडीच्या वित्तीय संस्थांचा समावेश आहे.
यासोबतच मॉर्गन स्टॅनली इंडिया, सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया, जेपी मॉर्गन इंडिया आणि एचएसबीसी सिक्युरिटीज अँड कॅपिटल मार्केट्स (इंडिया) यांसारख्या आंतरराष्ट्रीय गुंतवणूक बँकाही या प्रक्रियेत सहभागी आहेत.
आघाडीच्या कायदेविषयक फर्म्सची नियुक्ती
आयपीओ प्रक्रियेसाठी सिरिल अमरचंद मंगलदास, खेतान अँड कंपनी, लॅथम अँड वॅटकिन्स, सिडली ऑस्टिन, एझेडबी अँड पार्टनर्स, एसअँडआर असोसिएट्स, शार्दूल अमरचंद मंगलदास आणि ट्रायलीगल या आठ आघाडीच्या कायदेविषयक फर्म्सची नियुक्ती करण्यात आली आहे.
विविध क्षेत्रातील तज्ज्ञ कंपन्यांचा सहभाग
आयपीओ प्रक्रियेसाठी एमयूएफजी इनटाइम इंडिया, मकरंद एम जोशी अँड कंपनी, मनियन अँड राव, आरबीएसए अॅडव्हायझर्स, कॉन्सेप्ट कम्युनिकेशन आणि रेडसीअर स्ट्रॅटेजी कन्सल्टंट्स यांसारख्या कंपन्यांचीही निवड करण्यात आली आहे. या संस्था नियामक प्रक्रिया, ड्यू डिलिजन्स, कागदपत्रीकरण, मार्केटिंग आणि आयपीओ अंमलबजावणीमध्ये एनएसईला मदत करणार आहेत.
या प्रक्रियेसाठी मध्यस्थांच्या निवड आणि नियुक्तीसाठी सल्लागार म्हणून काम करणाऱ्या रॉथस्चाइल्ड अँड कंपनी इंडिया यांची भूमिका आता संपुष्टात आली आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.