शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी १८ मार्चपर्यंत अर्ज करण्याची संधी; student.maharashtra.gov.in वर उपलब्ध सुविधा
मुंबई: शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी आरटीई अंतर्गत दुर्बल आणि वंचित घटकांतील बालकांसाठी राखीव असलेल्या २५ टक्के जागांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. पालकांना अधिक वेळ मिळावा यासाठी ही मुदत १८ मार्च २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे.
किती दिवस अर्ज करता येणार?
यापूर्वी १७ फेब्रुवारी ते ११ मार्च या कालावधीत अर्ज करण्याची मुदत होती. आता ही मुदत वाढवून १८ मार्च करण्यात आली आहे. पात्र पालकांनी या मुदतवाढीचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे.
कुठे कराल अर्ज?
पालकांना अर्ज सादर करण्यासाठी https://student.maharashtra.gov.in/adm_portal या शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पात्र पालकांनी या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावेत.
नियम काय?
बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ (१) (क) नुसार दुर्बल आणि वंचित घटकांतील बालकांना स्वयंअर्थसहाय्यित आणि विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश देण्याची प्रक्रिया राबवली जाते. या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील बालकांना दर्जेदार शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळते.
प्रशासनाला सूचना
शिक्षण विभागाने क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी, कर्मचारी आणि शाळांना ही माहिती जास्तीत जास्त पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. ठाणे जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फतही पात्र बालकांच्या पालकांनी या योजनेचा लाभ घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.