⚡ ब्रेकिंग News

फलटणमध्ये धक्कादायक प्रकार: सहावीच्या विद्यार्थिनींकडून दहावीचे पेपर तपासले? सीसीटीव्ही फुटेजमुळे खळबळ


  फलटणमध्ये धक्कादायक प्रकार: सहावीच्या विद्यार्थिनींकडून दहावीचे पेपर तपासले? सीसीटीव्ही फुटेजमुळे खळबळ

 विडणी येथील उत्तरेश्वर हायस्कूलमधील शिक्षक वैभव शेंडेंवर गंभीर आरोप; सीसीटीव्हीमध्ये कैद झाली घटना

सातारा: दहावीच्या परीक्षेशी संबंधित एक धक्कादायक प्रकार सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात समोर आला आहे. येथील विडणी गावातील उत्तरेश्वर हायस्कूलमध्ये एका शिक्षकाने सहावीच्या दोन विद्यार्थिनींकडून दहावीच्या मराठी विषयाचा पेपर तपासून घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आल्याने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

सीसीटीव्हीमध्ये कैद झाला प्रकार

उत्तरेश्वर हायस्कूलमधील शिक्षक वैभव शेंडे असे या शिक्षकाचे नाव असून, ते दहावीचा मराठी विषयाचा पेपर तपासत असताना सहावीच्या दोन विद्यार्थिनींकडून मदत घेत असल्याचा आरोप आहे. या संदर्भातील सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. आता संबंधित शिक्षकावर शिक्षण विभागाकडून काय कारवाई केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुख्याध्यापिकांनी बोलण्यास टाळाटाळ

या प्रकरणाबाबत शाळेच्या मुख्याध्यापिका शुभांगी शिर्के यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांनी फोनवर बोलण्यास नकार देत प्रत्यक्ष भेटून माहिती देऊ, असे सांगितले.

पुण्यात दहावीच्या गणिताचा पेपर लीक

दरम्यान, राज्यात दहावी-बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडाव्यात यासाठी राज्य मंडळाकडून प्रयत्न सुरू असतानाच विविध गैरप्रकार समोर येत आहेत. नागपूरमधील पेपर फुटीच्या प्रकरणानंतर आता पुणे जिल्ह्यात दहावीचा गणिताचा पेपर टेलिग्रामवर लीक झाल्याची घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या गणित भाग-२ ची प्रश्नपत्रिका परीक्षा होण्याच्या तीन दिवस आधीच एका टेलिग्राम ग्रुपवर शेअर करण्यात आली होती. बोर्डाने अधिकृत प्रश्नपत्रिकेशी पडताळणी केल्यानंतर दोन्ही पेपर तंतोतंत जुळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी पुणे बोर्डाने पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...