⚡ ब्रेकिंग News

माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्लांवर जम्मूत गोळीबार; लग्न समारंभातून बाहेर पडताच हल्ला, उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी जखमी

माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्लांवर जम्मूत गोळीबार; लग्न समारंभातून बाहेर पडताच हल्ला, उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी जखमी

ग्रेटर कैलाश परिसरात वकिलाच्या मुलाच्या लग्नाला उपस्थित असताना हल्ला; आरोपी कमल सिंह जमवाल झुडपांत लपलेल्या अवस्थेत पकडला

जम्मू : जम्मू-कश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे ज्येष्ठ नेते डॉ. फारूक अब्दुल्ला यांच्यावर जम्मूमध्ये गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी (11 मार्च) घडली. ग्रेटर कैलाश परिसरात एका वकिलाच्या मुलाच्या लग्न समारंभातून बाहेर पडताना त्यांच्यावर हा हल्ला झाला. सुदैवाने फारूक अब्दुल्ला या हल्ल्यात थोडक्यात बचावले असून, यावेळी उपस्थित असलेले जम्मू-कश्मीरचे उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी मात्र किरकोळ जखमी झाले आहेत.

हल्लेखोर ताब्यात  

फारूक अब्दुल्ला यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीला सुरक्षा रक्षकांनी तातडीने पकडले. आरोपीचे नाव कमल सिंह जमवाल असून, हल्ल्यानंतर तो झुडपांमध्ये लपून बसल्याचे समोर आले आहे. सुरक्षाकर्मींनी त्याला शोधून काढून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी आरोपीकडे चौकशी सुरू केली असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

कशी घडली घटना?  

फारूक अब्दुल्ला हे त्यांच्या परिचयाच्या वकिलाच्या मुलाच्या लग्न समारंभासाठी जम्मूच्या ग्रेटर कैलाश परिसरातील बँक्वेट हॉलमध्ये आले होते. तब्बल एक तास ते समारंभात थांबले होते. मात्र, समारंभ आटोपून ते बाहेर पडताच एका हल्लेखोराने त्यांच्यावर गोळीबार केला. या घटनेमुळे जम्मू परिसरात एकच खळबळ उडाली असून, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली आहे. सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...