⚡ ब्रेकिंग News

पोलीस वेल्फेअर असोसिएशनच्या पंपावरच कायद्याचे उल्लंघन; डबे अन् कॅनमधून सर्रास पेट्रोलचे वितरण; अफवांमुळे यवतमाळच्या मारेगावात लांबच लांब रांगा


 पोलीस वेल्फेअर असोसिएशनच्या पंपावरच कायद्याचे उल्लंघन; डबे अन् कॅनमधून सर्रास पेट्रोलचे वितरण; अफवांमुळे यवतमाळच्या मारेगावात लांबच लांब रांगा

आंतरराष्ट्रीय संघर्षामुळे पुरवठा खंडित होण्याच्या अफवेने नागरिकांमध्ये भीती; रात्री दोन वाजेपर्यंत इंधन भरण्यासाठी धावाधाव

यवतमाळ: राज्यातील अनेक पेट्रोल पंपांवर इंधन तुटवड्याच्या अफवांमुळे नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. अशातच यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव येथे पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या अफवेमुळे शहरातील पोलीस वेल्फेअर पेट्रोल पंपावर नागरिकांची मोठी गर्दी उसळली. मात्र, यावेळी पोलीस वेल्फेअर असोसिएशनच्याच पंपावर कायद्याचे उल्लंघन झाल्याचे समोर आले आहे.

डबे-कॅनमध्ये इंधन साठवण्याचा प्रयत्न

मारेगाव येथे रात्री उशिरापर्यंत, म्हणजेच तब्बल दोन वाजेपर्यंत नागरिकांनी इंधन भरण्यासाठी धावाधाव केली. अनेकांनी गाड्यांच्या टाक्या फुल करून घेतल्या, तर काहींनी चक्क डबे, बाटल्या आणि कॅनमध्येही इंधन साठवण्याचा प्रयत्न केला.

डबे, बाटल्या आणि कॅनसारख्या गोष्टींमध्ये पेट्रोल देता येत नाही, यासंदर्भात स्पष्ट नियम असून असे करणे बेकायदेशीर आहे. तरीही पोलीस वेल्फेअर असोसिएशनच्या पंपावरच हे कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे पुढे आले आहे.

अफवांमुळे निर्माण झाली परिस्थिती

सोशल मीडियावर आंतरराष्ट्रीय संघर्षामुळे इंधन पुरवठा खंडित होणार असल्याची चर्चा व्हायरल झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. अफवांच्या बाजारामुळे गाड्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेल भरून ठेवण्यासाठी वाहनधारकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.

प्रशासनाचे आवाहन

अधिकृतरीत्या कोणताही तुटवडा नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, पोलीस वेल्फेअर असोसिएशनच्या पंपावरच कायद्याचे उल्लंघन झाल्याने प्रशासनाची चांगलीच पंचाईत झाली आहे.

या घटनेनंतर पोलीस वेल्फेअर असोसिएशनच्या पंपावरील कारभाराबाबत आणि डबे-कॅनमध्ये इंधन वितरण केल्याप्रकरणी कारवाईची मागणी होत आहे. दरम्यान, अफवांवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...