⚡ ब्रेकिंग News

'ही माझी बायको नाही रे...', इव्हेंटमध्ये मिस्ट्री वुमनसोबत स्पॉट झाला प्रसिद्ध अभिनेता; सर्वांसमोर म्हणाला असं काही की... VIDEO


'ही माझी बायको नाही रे...', इव्हेंटमध्ये मिस्ट्री वुमनसोबत स्पॉट झाला प्रसिद्ध अभिनेता; सर्वांसमोर म्हणाला असं काही की... VIDEO

फरदीन खानचा व्हिडिओ व्हायरल; 'खूप हँडल्सवर हिचा माझी पत्नी म्हणून उल्लेख करता', बहिणीची ओळख सांगत केले स्पष्टीकरण

मुंबई: बॉलिवूड अभिनेता फरदीन खान नुकताच एका इव्हेंटमध्ये स्पॉट झाला. यावेळी तो एका महिलेसोबत आला होता. फरदीन सुटाबुटात होता, तर ती महिला ब्लॅक कलरच्या ट्रेडिशनल आऊटफिटमध्ये दिसली. दोघांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. अनेकांनी फरदीन खानची पत्नी म्हणून दोघांचे फोटो शेअर करायला सुरुवात केली. पण, अभिनेत्याने स्वतःच या अफवांवर पूर्णविराम ठोकला.

'ही माझी बायको नाही...'

इव्हेंटमध्ये उपस्थित असलेल्या पॅपाराझींनाही ती महिला फरदीनची पत्नी असल्याचा समज झाला होता. मात्र, फरदीन खानने याबाबत स्पष्टीकरण देताना व्हिडिओमध्ये म्हटले की, "मला स्पष्ट करायचंय की, ही माझी पत्नी नाही... ही माझी बहीण आहे... खूप हँडल्सवर तुम्ही सारेजण हिचा माझी पत्नी म्हणून उल्लेख करता..."

फरदीचे हे वक्तव्य ऐकताच त्याच्यासोबत असलेली महिला खळखळून हसू लागली. ती म्हणाली, "हे खरंच खूप गरजेचं होतं..."

ती' मिस्ट्री वुमन कोण?

फरदीन खानसोबत दिसलेली मिस्ट्री वुमन म्हणजे त्याची सखी बहीण लैला खान आहे. बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते फिरोज खान यांची ही दोन्ही मुले आहेत. लैला खान यांनी फरहान फर्नीचरवाला याच्याशी लग्न केले आहे. लैला खान सामान्यतः लाईमलाईटपासून दूर असते, त्यामुळे ती फरदीनसोबत दिसल्यानंतर चाहत्यांना तिच्याबद्दल उत्सुकता वाटू लागली होती.

चाहत्यांच्या प्रतिक्रिया

फरदीन खानने केलेल्या या स्पष्टीकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. चाहत्यांनी अभिनेत्याच्या या स्पष्टीकरणाचे कौतुक केले आहे. अनेकांनी 'भाऊ-बहीण'चे हे जोडी पाहून आनंद व्यक्त केला आहे. फरदीनने विनोदी शैलीत केलेल्या स्पष्टीकरणामुळे चाहत्यांमध्ये हसळवाळीचे वातावरण निर्माण झाले.

फरदीन खानने त्याच्या बहिणीची ओळख स्पष्ट करत अफवांवर पूर्णविराम ठोकला आहे. या व्हिडिओनंतर आता लोक फरदीन आणि लैला यांच्या भावंडांच्या बॉण्डचे कौतुक करत आहेत.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...