⚡ ब्रेकिंग News

पत्नीला कारमधून ओढून बेदम मारहाण, मग अंगावर कार घालून चिरडले; गाणगापूर देवदर्शनातून हादरवणारी हत्या


कौटुंबिक वादातून पतीने २८ वर्षीय पत्नीची अमानुष हत्या; बारामती दाम्पत्याची कलबुर्गीतील देवदर्शन यात्रा ठरली अंतिम प्रवास

कलबुर्गी (कर्नाटक): देवदर्शनासाठी गाणगापूरला जात असताना पतीने आपल्या २८ वर्षीय पत्नीला धावत्या कारमधून ओढून रस्त्यावर फेकले आणि बेदम मारहाण केली. नंतर तिच्या अंगावर कार घालून तिला चिरडले. या क्रूर घटनेत महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील गाणगापूर जवळील बल्लुरगी गावाजवळ घडली.

बारामती येथील हे दाम्पत्य गाणगापूर येथे देवदर्शनासाठी आले होते. प्रवासादरम्यान पती-पत्नीमध्ये जोरदार वाद झाला. वाद विकोपाला गेल्याने पतीने रागाच्या भरात पत्नीला कारमधून खाली ओढले आणि रस्त्यावरच तिच्यावर अमानुष मारहाण सुरू केली.

या प्रकाराकडे पाहून स्थानिक नागरिक मदतीसाठी धावले. काही नागरिकांनी मध्यस्थी करत दोघांना शांत करण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही स्थानिकांनी मोबाईलमध्ये संपूर्ण घटना रेकॉर्ड केली. नागरिक उपस्थित असताना आरोपी शांत दिसत होता, पण ते दूर जाताच त्याने क्रूरतेचा कळस गाठला.

मारहाणीमुळे रस्त्याच्या कडेला पडलेल्या पत्नीवर आरोपी पतीने थेट कार चढवली आणि तिच्या अंगावरून कार फिरवली. या अमानुष कृत्यामुळे महिलेला गंभीर दुखापत होऊन जागीच मृत्यू झाला.

प्राथमिक माहितीनुसार, पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात ही घटना केवळ रागाच्या भरात घडलेली नसून पूर्वनियोजित असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

घटनेची माहिती मिळताच कर्नाटक पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतले असून त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ (खून) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...