⚡ ब्रेकिंग News

मुंबईचा विजेतेपदाचा दुष्काळ संपणार? हार्दिकच्या सेनेची पहिली आव्हाने कोलकाता, दिल्ली, राजस्थान आणि बंगळुरू


मुंबईचा विजेतेपदाचा दुष्काळ संपणार? हार्दिकच्या सेनेची पहिली आव्हाने कोलकाता, दिल्ली, राजस्थान आणि बंगळुरू

आयपीएल 2026 च्या पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर; 29 मार्चला वानखेडेवर केकेआरविरुद्ध मुंबईचा पहिला सामना, 12 एप्रिलला आरसीबीविरुद्ध महामुकाबला

मुंबई : भारतीय क्रिकेट चाहत्यांचा उत्साह टी-20 वर्ल्डकपच्या विजेतेपदानंतर शिगेला पोहोचला असताना आयपीएलच्या 19 व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. बीसीसीआयने गुरुवारी पहिल्या 16 दिवसांतील 20 सामन्यांचे वेळापत्रक प्रसिद्ध केले. यानुसार, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स पहिल्या टप्प्यात चार सामने खेळणार आहे.

मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 29 मार्च रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध होणार आहे. हा सामना सायंकाळी 7.30 वाजता सुरू होईल. त्यानंतर मुंबईची दुसरी लढत 4 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध दिल्लीत होईल. तिसरा सामना 7 एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध गुवाहाटीत तर चौथा आणि पहिल्या टप्प्यातील शेवटचा सामना 12 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध मुंबईत होईल.

रोहित-विराट एकाच मैदानावर 

12 एप्रिल रोजी वानखेडे स्टेडियमवर होणारा मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील सामना क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार आहे. या सामन्यात मुंबईकडून रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह तर आरसीबीकडून विराट कोहली मैदानात उतरणार आहे.

मुंबई इंडियन्सने रोहित शर्माकडून कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे दिल्यानंतरही संघाला विजेतेपद मिळवता आलेले नाही. 2020 नंतर मुंबईवर विजेतेपदाचा दुष्काळ आहे. हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह यांसारख्या दिग्गजांचा भरणा असलेला मुंबईचा संघ यंदा हा दुष्काळ संपवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पहिल्या टप्प्यातील मुंबईचे सामने :

मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स : 29 मार्च, वानखेडे स्टेडियम, मुंबई (सायं. 7.30)

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स : 4 एप्रिल, दिल्ली (दु. 3.30)

राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स : 7 एप्रिल, गुवाहाटी (सायं. 7.30)

मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु : 12 एप्रिल, वानखेडे स्टेडियम, मुंबई (सायं. 7.30)

मुंबई इंडियन्सचा संघ : हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, क्विंटन डी कॉक, मिचेल सँटनर, विल जॅक्स, रॉबिन मिंझ, रयान रिकेल्टन, अल्लाह गझनफर, अश्विनी कुमार, नमन धीर, राज बावा, रघु शर्मा, कॉर्बिन बॉश, शेरफेन रदरफोर्ड, मयंक मारकंडे, दानिश मालेवार, मोहम्मद इजहार, अथर्व अंकोलेकर, मयंक रावत

आयपीएल 2026 चा पहिला सामना 28 मार्च रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात बंगळुरु येथे होईल.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...