⚡ ब्रेकिंग News

"सरसेनापती गेला म्हणून रडायचं नाही, लढायचं!"; नेतृत्व संपूनही इराण युद्ध कसा लढतोय? पहिल्यांदाच चार पदरी आखणी समोर

"सरसेनापती गेला म्हणून रडायचं नाही, लढायचं!"; नेतृत्व संपूनही इराण युद्ध कसा लढतोय? पहिल्यांदाच चार पदरी आखणी समोर

अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यांनंतरही इराणचा पलटवार चकित करणारा; 'मोझॅक डिफेन्स'च्या माध्यमातून सात स्वतंत्र युनिट्समध्ये विभागले लष्कर, प्रत्येक पदासाठी चार उत्तराधिकारी

नवी दिल्ली/तेहरान : इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यातील युद्धाला 13 दिवस झाले असून, पहिल्याच दिवशी इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या निधनानंतर जवळपास 50 उच्च अधिकारी मारले गेले. मात्र, नेतृत्व संपूनही इराणकडून होत असलेल्या पलटवाराने अमेरिका आणि इस्रायलला बुचकळ्यात टाकले आहे. नेतृत्व संपल्यानंतरही इराण अचूक लक्ष्य कसे भेदत आहे, याची चिंता पेंटागॉनला सतावत असल्याचे समोर आले आहे. यामुळे इराणची 'मोझॅक डिफेन्स' (Mosaic Defense) नावाची खास रणनीती जगासमोर आली आहे.

काय आहे मोझॅक डिफेन्स?

अल जझीराच्या माहितीनुसार, इराणने युद्धासाठी एक विशिष्ट रणनीती विकसित केली आहे. यामध्ये लष्कराच्या कमांडला एकत्रित न ठेवता सात लहान, स्वतंत्र तुकड्यांमध्ये विभागले आहे. शिवाय, प्रत्येक पदासाठी चार संभाव्य उत्तराधिकारी पूर्व-निश्चित केले गेले आहेत. या संकल्पनेला 'चौथा उत्तराधिकारी' असे म्हटले जाते.

इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी 1 मार्च रोजी स्पष्ट केले होते की, देशाने अमेरिकेच्या युद्धांचा दोन दशकांपासून अभ्यास केला आहे. या धड्यांपासून शिकत, अशी सुरक्षा रचना तयार करण्यात आली आहे की राजधानीवर हल्ला झाल्यानंतरही लढाई चालू ठेवता येईल.

सात स्वतंत्र युनिट्समध्ये विभागले लष्कर 

'विकेंद्रित मोझॅक डिफेन्स' प्रणाली इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) शी संबंधित असून, माजी कमांडर मोहम्मद अली जाफरी (2007-2019) यांच्या कार्यकाळात विकसित करण्यात आली. या फ्रेमवर्कमध्ये IRGC, बासीज मिलिशिया, नियमित सैन्य, क्षेपणास्त्र युनिट्स, नौदल आणि स्थानिक कमांड स्ट्रक्चर्स नेटवर्क म्हणून काम करतात. संवाद बिघाड झाल्यास स्थानिक युनिट्सना स्वतंत्रपणे कृती करण्याचे स्वातंत्र्य आहे.

इराणने का स्वीकारली ही रणनीती?  

2001 मध्ये अफगाणिस्तान आणि 2003 मध्ये इराकवर अमेरिकेने केलेल्या आक्रमणात सद्दाम हुसेनची केंद्रीकृत राजवट काही दिवसांत कोसळली. कमांड स्ट्रक्चरवर झालेल्या हल्ल्याने सर्वकाही उद्ध्वस्त झाले. इराणने हे पाहिले आणि धडा घेतला की केंद्रीय कमांडवर अवलंबून राहणे धोकादायक आहे. म्हणूनच इराणने लष्कर अधिक केंद्रीकृत न करता त्याऐवजी लहान तुकड्यांमध्ये विभागले.

प्रत्येक पदासाठी चार उत्तराधिकारी 

इराणने अनेक लष्करी आणि प्रशासकीय पदांसाठी पूर्व-निर्धारित उत्तराधिकारी ठरवले आहेत. बहुतांश प्रकरणांमध्ये चार उत्तराधिकारी नियुक्त केले गेले आहेत. जर पहिला उत्तराधिकारी मारला गेला तर दुसरा, तिसरा किंवा चौथा उत्तराधिकारी तत्काळ कार्यभार सांभाळू शकतो. ही व्यवस्था केवळ सर्वोच्च नेत्यांपुरती मर्यादित नसून कमांडर, अधिकारी आणि संपूर्ण यंत्रणेला लागू आहे.

अमेरिका आणि इस्रायलची लष्करी रणनीती जलद आणि अचूक हल्ल्यांद्वारे शत्रूच्या नेतृत्व आणि कमांड सिस्टमला नष्ट करण्यावर केंद्रित आहे. इराणचा मोझॅक डिफेन्स हा याच रणनीतीला प्रतिसाद मानला जातो. इराणच्या विचारसरणीनुसार, युद्ध केवळ सुरुवातीच्या लष्करी ताकदीने ठरवले जात नाही, तर वेळ, सहनशक्ती आणि संघटनात्मक क्षमता देखील तितकीच महत्त्वाची भूमिका बजावतात.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...