आरटीआय कार्यकर्त्याचा गंभीर आरोप – 'ज्या ठिकाणी महिला आणि अल्पवयीन मुलींचे शोषण, त्या ठिकाणासाठी सरकारने पुरवला निधी'; २०१८ चा जीआरही समोर
नाशिक: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाच्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. अशातच, भोंदूबाबा अशोक खरात ज्या ठिकाणी विकृतीचा कळस गाठला, त्याचे बांधकाम सरकारी खर्चातून झाल्याचे समोर आले आहे. पर्यटन खात्याकडून दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, या प्रकरणी तत्कालीन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी प्रश्न विचारताच पळ काढल्याचे पाहायला मिळाले.
पर्यटन खात्याकडून दीड कोटींचा निधी
आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केलेल्या दाव्यानुसार, नाशिकच्या मिरगावमधील श्री सिद्धेश्वर इशानेश्वर देवस्थानला पर्यटन विभागाकडून मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आला. तत्कालीन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडून या ट्रस्टला दीड कोटी रुपयांचा निधी देण्यात आल्याचे बोलले जात आहे. अशातच, खरात प्रकरणावर प्रश्न विचारताच मंत्री जयकुमार रावल यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता विधिमंडळाच्या पायऱ्यांवरून निघून जाणे पसंत केले.
सरकार पुरस्कृत बाबा' असा आरोप
धक्कादायक म्हणजे पर्यटनाचा निधी मंदिरासाठी दिल्याचा आरोप करत खरात हा सरकार पुरस्कृत बाबा असल्याचा दावा विजय कुंभार यांनी केला आहे. भोंदू अशोक खरातवर महायुती सरकारची देखील मेहरबानी करण्यात आली असून २०१८ चा जीआरही समोर आला आहे.
२०१८ चा जीआर समोर
या संबंधित ३१ मार्च २०१८ रोजी जीआर काढण्यात आला आहे. पर्यटन विभागाने ३१ मार्च २०१८ ला हा निर्णय घेतला आणि त्याच वर्षी २५ लाख रुपयांचा निधी देण्यात आला. हे काम मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने करायचे, असे त्यात नमूद आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने हे काम पूर्ण केल्याची माहिती आहे.
कुंभार यांचा गंभीर आरोप
आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी पुरावे सादर करताना म्हटले की, या निधीतून सभामंडप बांधकाम, पेव्हर ब्लॉक बसवणे, महिला व पुरुष प्रसाधनगृह, चेंजिंग रूम, भक्तनिवास बांधकाम, विद्युतीकरण व लँडस्केपिंग करण्यात आले. कुंभार यांनी आरोप केला की, "ज्या ठिकाणी महिला आणि अल्पवयीन मुलींचे शोषण झाले, त्या ठिकाणासाठी सरकारने निधी पुरवला. हे सरकार खरातवर कशी खैरात करत होते, याचा पुरावा आहे."
अशोक खरातची संपत्ती
समोर आलेल्या माहितीनुसार, अशोक खरातची विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात संपत्ती असल्याचे समोर आले आहे:
१. पाथर्डीत १५० कोटींची ३० एकर जमीन
२. सिन्नरच्या कहांडळवाडीत ५ कोटींची ४५ एकर जमीन
३. पाथर्डी, गौळणे ३० कोटींच्या जमिनी
४. सिन्नरमध्ये १ कोटींचे व्यापारी गाळे
५. मीरगावातील फार्म हाऊसची किंमत १० कोटींच्या घरात
६. अहिल्यानगरमध्ये ५ एकरांचा भूखंड
७. ओझर विमानतळाजवळ ५ एकर जमीन
८. जानोरी, दहावा मैल भागात मोक्याच्या ठिकाणी जमिनी
९. नाशिकमधील कॅनडा कॉर्नर परिसरात कार्यालय
१०. कर्मयोगीनगरमध्ये ५ कोटींचा बंगला
११. शिर्डीच्या पानमळ्यात ३० गुंठे जागा
१२. निघोजमध्ये ४ एकर जागा
१३. शिर्डीत ७० कोटींच्या जमिनी, प्लॉट
१४. सिन्नरमध्ये मोक्याच्या जागांवर दुकाने
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.