⚡ ब्रेकिंग News

‘हास्यजत्रा’ फेम निखिल बनेचा कोकणात अपघात! बाईक घसरली, व्हिडिओ करत चाहत्यांना सांगितली कहाणी


 ‘हास्यजत्रा’ फेम निखिल बनेचा कोकणात अपघात! बाईक घसरली, व्हिडिओ करत चाहत्यांना सांगितली कहाणी

 हिंमतगडाकडे जाताना उंच चढावर बाईकवरून नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. सुदैवाने निखिलला गंभीर दुखापत झाली नसून, त्याने मदत करणाऱ्या कोकणातील ग्रामस्थांचे आभार मानले आहेत.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता निखिल बने याचा कोकणात बाईक राइड करत असताना अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने या अपघातात त्याला गंभीर दुखापत झालेली नसून, किरकोळ जखमा झाल्या आहेत. निखिलने स्वतः सोशल मीडियावर एका व्हिडिओतून ही माहिती चाहत्यांना दिली.

‘हास्यजत्रा’ फेम निखिल बने सध्या ‘कोको राईड’ नावाची एक युट्युब ब्लॉग सिरीज करत आहे. या सिरीजच्या शूटसाठी तो कोकणात मंडणगड-दापोली परिसरात बाईकवर फिरत होता. त्यावेळी हिंमतगडाकडे जाताना हा अपघात झाल्याचे त्याने सांगितले.

व्हिडिओ करत चाहत्यांना सांगितली स्टोरी

या प्रवासाविषयी बोलताना निखिल म्हणाला, “इतकं छान वाटतंय, वेगवेगळे लोक येतात. प्रेमाने बोलतायत. प्रत्येक ठिकाणी मला हा अनुभव येतोय. खूप गोड माणसं आहेत. फिरलं पाहिजे.”

तो पुढे म्हणाला, “एक प्रॉब्लेम झाला. हिम्मतगडाकडे जाताना एक छोटसं गाव आहे. तिथून उजवीकडून मी वर जात होतो. तिथे चढ होता. मला गाडी कंट्रोल झाली नाही. मी तिथे पडलो. त्याचवेळी बाईकवरून जाणारे दादा होते, खारी-बटर विकतात ते... त्यांनी मला मदत केली. त्या गावातल्या बायकांनी मला पाणी विचारलं, मदत केली.”

कोकणातील लोकांचे केले कौतुक

निखिलने पुढे कोकणातील लोकांचे आभार मानताना सांगितले की, “कोकणातल्या बऱ्याच लोकांचे कौतुक आहे. इथल्या सगळ्या लोकांचे खूप खूप आभार. या सगळ्यांची नाव मला माहित नाहीत, पण चेहरे कधीच विसरू शकणार नाही.” या अपघातात त्याच्या हाताला आणि पायाला दुखापत झाल्याचेही त्याने सांगितले.

चाहत्यांकडून काळजी व्यक्त

निखिलच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी ‘काळजी घेऊन बाईक चालव’, ‘आरामात सांभाळून...’, ‘काळजी घे भाई, आपल्या कोकणचे रस्ते आहेत, बाईक हळू चालव, आपली माणसं मदत करणारच...’ अशा कमेंट्स करत आपली काळजी व्यक्त केली आहे. तसेच अनेक चाहत्यांनी ‘तू ठीक आहेस ना?’ असे विचारत त्याच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. काहींनी त्याला कोकणात आणखी कुठे कुठे भेटी द्यायला हवी, याचे सुचनाही दिले आहेत.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...