⚡ ब्रेकिंग News

शेन वॉर्नचा २० वर्षांपूर्वीचा ‘डाव’ आता कुटुंबाला देणार ४६० कोटींचा गंध! राजस्थान रॉयल्सच्या मूल्यवाढीचा थेट फायदा


  शेन वॉर्नचा २० वर्षांपूर्वीचा ‘डाव’ आता कुटुंबाला देणार ४६० कोटींचा गंध! राजस्थान रॉयल्सच्या मूल्यवाढीचा थेट फायदा

 आयपीएलच्या पहिल्या हंगामात राजस्थान रॉयल्सला विजेतेपद मिळवून देणाऱ्या दिवंगत शेन वॉर्नने फ्रँचायझीमध्ये हिस्सा मागितला होता. आता फ्रँचायझीचे मूल्य गगनाला भिडल्याने वॉर्नच्या कुटुंबाला तब्बल ४६० कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे.

ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज फिरकीपटू दिवंगत शेन वॉर्नच्या कुटुंबीयांना राजस्थान रॉयल्सकडून ४५० ते ४६० कोटी रुपये मिळू शकतात. हा मोठा फायदा वॉर्नने २० वर्षांपूर्वी संघासोबत करार करताना घेतलेल्या एका निर्णयामुळे मिळणार आहे.

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पहिल्या हंगामात राजस्थान रॉयल्सने शेन वॉर्नची कर्णधार म्हणून नियुक्ती केली होती. त्यावेळी त्याच्यावर केवळ खेळाडू आणि कर्णधार म्हणूनच नव्हे, तर क्रिकेट ऑपरेशन्सशी संबंधित अनेक निर्णयांची जबाबदारीही सोपवण्यात आली होती. या काळात वॉर्नने आपल्या पगारासोबत फ्रँचायझीमध्ये वाटा मागितला होता, जो संघ व्यवस्थापनाने मान्य केला. राजस्थान रॉयल्सने आयपीएलचा पहिलाच हंगाम जिंकला. ४ मार्च २०२२ रोजी वयाच्या ५२ व्या वर्षी शेन वॉर्नचे निधन झाले.

शेन वॉर्नच्या कुटुंबीयांना मोठा फायदा

राजस्थान रॉयल्स व्यवस्थापनाने केलेल्या करारानुसार, वॉर्नला प्रति सीझन अंदाजे $६,५७,००० (सुमारे ५.६ कोटी रुपये) पगार आणि संघात ०.७५ टक्के हिस्सा देण्यात आला. वॉर्न राजस्थान रॉयल्सकडून सलग चार सीझन खेळला, त्यानंतर त्याचा एकूण हिस्सा अंदाजे ३ टक्क्यांपर्यंत वाढला.

आता अमेरिकन उद्योगपती कल सोमानी यांनी अंदाजे $१.६३ अब्ज, म्हणजेच सुमारे १५,३०० कोटी रुपयांना राजस्थान रॉयल्स विकत घेतल्याने फ्रँचायझीचे मूल्य गगनाला भिडले आहे. यामुळे वॉर्नच्या ३ टक्के हिश्श्याचे मूल्यही अंदाजे ४६० कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे आता त्याच्या कुटुंबाला मिळणार आहे.

कुटुंबाला शेअर्स विकण्याची संधी मिळू शकते

शेन वॉर्न केवळ एक उत्कृष्ट फिरकी गोलंदाजच नव्हता, तर एक उत्तम कर्णधारही होता. त्याने २००८ ते २०११ या काळात राजस्थान रॉयल्सकडून चार हंगाम खेळले आणि ५५ सामन्यांमध्ये ५७ बळी घेतले. त्याचा सर्वात संस्मरणीय हंगाम २००८ चा होता, जेव्हा त्याच्या कर्णधारपदाखाली संघाने पहिले आयपीएल विजेतेपद पटकावले.

राजस्थान रॉयल्सची सुरुवातही रंजक राहिली आहे. २००८ मध्ये मनोज बदाळे यांच्या नेतृत्वाखालील एका गुंतवणूक गटाने ही फ्रँचायझी अंदाजे ६७ दशलक्ष डॉलर्समध्ये (सुमारे ५५० कोटी रुपये) विकत घेतली होती. आता जवळपास दोन दशकांनंतर तिचे मूल्य अनेक पटींनी वाढून १.६३ अब्ज डॉलर्स झाले आहे.

सूत्रांनुसार, २०२६ च्या आयपीएल हंगामानंतर वॉर्नच्या कुटुंबाला त्यांचे शेअर्स विकण्याची संधी मिळू शकते. तथापि, या संपूर्ण प्रक्रियेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) मंजुरी आवश्यक असेल.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...