⚡ ब्रेकिंग News

"रिलेशनमध्ये असूनही बंबल वापरायचा, दारूसह अनेक वाईट सवयी"; डॉ. स्तुतीच्या सुसाईड नोटमध्ये काळीज चिरणारी व्यथा

"रिलेशनमध्ये असूनही बंबल वापरायचा, दारूसह अनेक वाईट सवयी"; डॉ. स्तुतीच्या सुसाईड नोटमध्ये काळीज चिरणारी व्यथा

प्रियकराच्या वागण्याने हैराण होऊन डॉक्टर तरुणीने संपवले आयुष्य; सहा पानी चिठ्ठीत मांडला अपमान, अहंकार आणि अत्याचाराचा इतिहास

मुंबई : अँटॉप हिल परिसरातील एका धक्कादायक घटनेत डॉ. स्तुती सोनवणे या तरुण डॉक्टरने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिने लिहिलेली सहा पानांची सुसाईड नोट समोर आली आहे. या चिठ्ठीत तिने आपल्या प्रियकर फैजुल मोहम्मद खानवर गंभीर आरोप करत त्याच्या वर्तनाने आपण मानसिकदृष्ट्या किती त्रस्त झालो होतो, याची काळीज पिळवटून टाकणारी व्यथा मांडली आहे.

स्तुतीने लिहिलेल्या नोटनुसार, तिचे फैजुलसोबत एक वर्षांहून अधिक काळ प्रेमसंबंध होते. मात्र, या नात्यात तिला कधीच सुरक्षित वाटले नाही. फैजुलच्या अनेक वाईट सवयी होत्या - तो धूम्रपान करायचा, दारू प्यायचा. इतकेच नव्हे, तर तिच्याशी संबंध असतानाही त्याने बंबलसारखे डेटिंग अॅप फोनवर ठेवल्याचे तिने म्हटले आहे. तरीही तिने प्रेमापोटी त्याला माफ केल्याचे तिने नमूद केले.

"तू मला खूप अपमानित केलंस. मी इतकी वाईट आहे का? तुझे शब्द इतके तीव्र होते की ते माझं आयुष्य संपवण्यासाठी पुरेसे ठरले. मी पूर्णपणे सुन्न झाले आहे," अशा शब्दात स्तुतीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ती पुढे लिहिते, "तू माझ्यावर ओरडलास. मला वाटलं की मी तुझ्यासमोर असते तर तू मला मारलंच असतंस किंवा खूप हिंसक झाला असतास. मला तुझी भीती वाटते."

फैजुलने तिला उद्देशून केलेल्या वक्तव्यांचाही उल्लेख स्तुतीने केला आहे. "तू म्हणालास की तुझ्या वडिलांनी माझ्याबद्दल जे म्हटलं ते बरोबर होतं – तरुण मुली चांगल्या नसतात. तू म्हणालास की माझ्यावर खर्च केलेला वेळ आणि पैसे तुला वाया गेल्यासारखे वाटतात. त्याने माझी स्कूटी तोडून टाकण्याची धमकी दिली," असे तिने नोटमध्ये म्हटले आहे.

स्वतःबद्दल ती लिहिते, "कदाचित मी मूर्ख होते, आता तर आणखी मूर्ख आहे. पण मी त्याच्या प्रेमात पडले. मला काय करावं कळत नाहीये. मला सगळं संपवायचं आहे असं वाटतंय. माझ्यासोबत असं वागण्याइतकं मी काही चुकीचं केलं होतं असं मला वाटत नाही. फैजुल खरं तर सर्वात वाईट लोकांपैकी एक आहे."

शेवटी तिने नमूद केले आहे, "मला आशा आहे की तू आनंदी असशील आणि तुझा नाजूक पुरुष अहंकार आता समाधानी झाला असेल. मी आयुष्यात कधी इतकी खालच्या पातळीवर वाटले नव्हते." स्तुतीची ही सुसाईड नोट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, प्रियकराच्या छळाला कंटाळून एक यशस्वी डॉक्टर तरुणीने घेतलेल्या टोकाच्या निर्णयाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी याप्रकरणी फैजुलविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...