⚡ ब्रेकिंग News

24 तासात पुन्हा सहा मुली-युवक बेपत्ता; बुलढाण्यात महिला गायब होण्याचा सत्र कायम, पोलिसांची थातूरमातूर प्रेसनोट


24 तासात पुन्हा सहा मुली-युवक बेपत्ता; बुलढाण्यात महिला गायब होण्याचा सत्र कायम, पोलिसांची थातूरमातूर प्रेसनोट

गेल्या वर्षभरात दीड हजारांहून अधिक बेपत्ता; 2025 मध्ये आताच 289 जणांचा शोध सुरू, पालकांमध्ये दहशतीचे वातावरण

बुलढाणा : जिल्ह्यात महिला आणि मुली बेपत्ता होण्याचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. गेल्या 24 तासांत एका विवाहितेसह सहा मुली आणि एक युवक असे एकूण सहा जण बेपत्ता झाल्याची नोंद झाली आहे. यापूर्वीच बुधवारी सहा महिला बेपत्ता झाल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर गुरुवारी पुन्हा हीच स्थिती उद्भवल्याने सर्वसामान्य पालकांमध्ये चिंता आणि दहशतीचे वातावरण पसरले आहे.

बुलढाणा जिल्ह्यातून गेल्या वर्षी जवळपास दीड हजारांहून अधिक व्यक्ती बेपत्ता झाल्या होत्या, त्यापैकी हजाराहून अधिक महिला होत्या. 2025 चा विचार केला तर 1 जानेवारी ते 10 मार्च या कालावधीतच जिल्ह्यातील 289 जण बेपत्ता झाले असून, यामध्ये 200 हून अधिक महिलांचा समावेश आहे. मात्र, बेपत्ता झालेल्यांचा पुढे काय होतो याची कोणतीही माहिती समोर येत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांची प्रेसनोट वादात

बुधवारी 'एबीपी माझा'ने ही बातमी दिल्यानंतर पोलीस विभागाकडून तातडीने एक प्रेसनोट काढण्यात आली. मात्र, ही प्रेसनोट अत्यंत थातूरमातूर पद्धतीने तयार करून तिच्यावर कोणत्याही प्राधिकृत अधिकाऱ्याची सही नसल्याचे दिसून आले. या प्रेसनोटमध्ये पोलिसांनी 2025 मध्ये हरवलेल्या 87% महिला शोधून काढल्याचा दावा करत स्वतःची पाठ थोपटून घेतली आहे. मात्र, सध्या बेपत्ता झालेल्या महिला व मुलींची संख्या, त्यांचा शोध, बेपत्ता होण्यामागील कारणे याबाबत कोणताही सविस्तर खुलासा केलेला नाही.

पोलिसांनी जारी केलेल्या प्रेसनोटमध्ये म्हटले आहे की, पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात 'महिला मिसिंग डेस्क' आणि प्रत्येक पोलीस स्टेशनवर 'मिसिंग सेल' कार्यान्वीत करण्यात आला आहे. या यंत्रणेने 2025 मध्ये एकूण महिला मिसिंग प्रकरणांपैकी 87 टक्के महिलांचा शोध घेतल्याचा दावा केला आहे. तर 2021 पासून आत्तापर्यंत 284 महिला बेपत्ता असल्याची प्रलंबित प्रकरणे असून त्यांचा शोध सुरू असल्याचे सांगितले आहे.

प्रश्न अनुत्तरितच 

मात्र, गेल्या 24 तासांत बेपत्ता झालेल्या सहा महिला-युवकांबाबत पोलिसांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. तसेच बेपत्ता होण्याचे प्रमाण रोखण्यासाठी कोणती ठोस पावले उचलली जात आहेत, याबाबत पोलीस, प्रशासन, सामाजिक संस्था किंवा महिला आयोग काहीही बोलण्यास तयार नसल्याचे धक्कादायक चित्र आहे. त्यामुळे बुलढाण्यात नेमके काय घडत आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...