मुंबई/नाशिक: भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेत्यांवर शरद पवार गटाकडून गंभीर आरोप करण्यात आले आहेत. शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि रुपाली चाकणकर यांना या प्रकरणात सहआरोपी करण्याची मागणी केली आहे.
विकास लवांडे म्हणाले,
"लिंगपिसाट अशोक खरात याने अनेक महिलांचे शोषण केले आहे. त्याला शिक्षा झालीच पाहिजे. रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा आणि महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. पण फक्त राजीनामा देऊन काही होणार नाही. त्यांना या प्रकरणात सहआरोपी करणे गरजेचे आहे. तसेच सुनील तटकरे यांनाही सहआरोपी करावे. कारण रुपाली चाकणकर आणि सुनील तटकरे हे दोघेही अशोक खरातच्या नेहमी संपर्कात होते आणि त्यांना भेटायला जायचे."
कोकाटेंचा मंत्रिपदाचा मुद्दा
लवांडे यांनी आणखी एक खळबळजनक आरोप केला. ते म्हणाले,
"सिन्नर तालुक्यातील अशोक खरातला स्थानिक आमदार माणिकराव कोकाटे विरोध करायचे. या बाबासोबत त्यांचा कोणताही फोटो किंवा व्हिडिओ समोर आलेला नाही. पण माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपद मिळू नये म्हणून अशोक खरातने सुनील तटकरे यांच्याकडे आग्रह धरला होता. तो त्यासाठी तटकरेंना फोन करायचा की नाही, याचा खुलासा सुनील तटकरे आणि माणिकराव कोकाटे यांनी केला पाहिजे."
अंनिसचा आरोप
दरम्यान, अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) नेही सिन्नरमधील एका लोकप्रतिनिधीवर गंभीर आरोप केले आहेत. अंनिसचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी सांगितले की, सिन्नरचा एक लोकप्रतिनिधी अशोक खरातच्या संपर्कात होता. या नेत्याच्या १९९९ पासूनच्या प्रचारात खरात काम करत होता. निवडणूक झाल्यानंतर नाशिकच्या अंबड परिसरात मतदान यंत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी खाजगी सुरक्षा रक्षक नेमून जादूटोणा केल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी अंनिसने केली आहे.
या आरोपांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये खळबळ उडाली असून, अशोक खरात प्रकरण आता अधिकाधिक राजकीय नेत्यांपर्यंत पोहोचत असल्याचे दिसून येत आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.