मुंबई: मुंबई महानगरपालिकेत (BMC) पुन्हा एकदा प्रशासकीय बदल्यांचा धडाका सुरू झाला आहे. काही दिवसांपूर्वीच अधिकाऱ्यांच्या बदली प्रकरणावरून महापौर रितू तावडे चर्चेत आल्या होत्या, त्यानंतर आता पालिकेने सहाय्यक आयुक्त आणि कार्यकारी अभियंत्यांच्या रातोरात बदल्या केल्या आहेत.
पालिकेने जारी केलेल्या नवीन पत्रकानुसार, ‘एन’ विभाग (घाटकोपर) चे सहाय्यक आयुक्त गजानन बेल्लाळे यांची बदली ‘ए’ विभागात (कुलाबा, नरिमन पॉईंट) करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, बेल्लाळे यांच्याकडे ‘करनिर्धारण व संकलन’ विभागाचा अतिरिक्त कार्यभारही कायम ठेवण्यात आला आहे.
महापौर रितू तावडे यांच्या प्रभागातील या अधिकाऱ्याची बदली झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
इतर महत्त्वाच्या बदल्या
रोहित त्रिवेदी: सहाय्यक आयुक्त (आर/उत्तर विभाग) - अतिरिक्त कार्यभार
आनंद कंकाळ (कार्यकारी अभियंता): सहाय्यक आयुक्त (ई विभाग) - पूर्णवेळ कार्यभार
नयनीश वेंगुर्लेकर: नगर अभियंता विभागाकडे परत
जयदीप मोरे: नगर अभियंता विभागाकडे परत
या बदल्यांमुळे मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनात खळबळ उडाली असून, यामागे राजकीय दबाव आहे की प्रशासकीय गरज, याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.
पालिकेने या बदल्यांचे अधिकृत पत्रक काढले असून, संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ नव्या जागी रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.