⚡ ब्रेकिंग News

"भोंदू अशोक खरातकडे जाणारे ते ४० आमदार कोण? विमानाची व्यवस्था कोणी केली?"; संजय राऊतांची फडणवीस सरकारवर जोरदार टीका

"खरात दिल्लीला कोणाला भेटायला जायचा? राजमान्यता देणारे मंत्री आजही फडणवीस मंत्रिमंडळात आहेत, त्यांच्यावर बोलावे" - संजय राऊत

मुंबई: नाशिकच्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. खरातकडे ४० आमदार जात असल्याचा दावा खुद्द महायुती आमदार दीपक केसरकर यांनी केला असल्याने, त्या ४० आमदारांची नावे जाहीर करण्याची मागणी राऊत यांनी केली आहे.

संजय राऊत म्हणाले,  

"दीपक केसरकर सांगतात की मला एकट्यालाच का टार्गेट करता? खरातकडे ४० आमदार जात होते. ते ४० आमदार कोण आहेत, हे आता पुढे आले पाहिजे. खरातला विमानांची सोय करून देणारे सरकारमधील कोणते लोक होते, हेही जाहीर केले पाहिजे."

ते पुढे म्हणाले,  

"खरात दिल्लीमध्ये जात कोणाला भेटत होता, हे जर पोलिस तपासात समोर आले असेल तर तेही उघड केले पाहिजे. अशोक खरातचा वावर सर्वत्र होता. सरकारने त्याला राजमान्यता दिली होती. ज्यांनी त्याला राजमान्यता दिली, ते लोक आजही देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आहेत. फडणवीसांनी यावर बोलावे.

"फडणवीसांना आव्हान 

राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट आव्हान देत म्हटले,  

"एखाद्या समाजाच्या मंदिरासाठी मंत्री वेगळी व्यवस्था करत असतील तर आम्ही टीका करणार नाही. पण नरेंद्र मोदी यांनी जी चूक केली ती फडणवीस यांनी करू नये. त्यांनी विरोधी पक्षातील नेत्यांना सोबत घेऊन या प्रकरणावर बैठक घ्यावी. महाराष्ट्रात 'टीम महाराष्ट्र' तयार करायची असेल तर विरोधी पक्षनेता नेमावा."

झिरवाळ यांच्या व्हिडिओवर राऊतांची टीका

मंत्री झिरवाळ यांच्या व्हायरल व्हिडिओबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले,  

"मंत्री झिरवाळ यांचा व्हिडिओची पडताळणी कशी करणार? मुख्यमंत्री किरीट सोमय्यांच्या व्हिडिओची सत्यता तपासणार होते, पण ती पडताळली पाहिजे. विरोधी पक्षाबद्दल असते तर सरकार 'आधी फाशी मग चौकशी' अशी भूमिका घेतले असती. इथे मात्र फाशीचे नावच नाही, फक्त चौकशी सुरू आहे."

राऊत यांनी पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या 'टीम' वरही टिका केली. ते म्हणाले, "टीम इंडियामध्ये फक्त मोदी आणि अमित शहा आहेत का? महाराष्ट्रात टीम बनवायची असेल तर विरोधकांना विश्वासात घ्या. दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेते नेमले पाहिजेत."

संजय राऊत यांनी अशोक खरात प्रकरण पूर्णपणे उघड करण्याची मागणी केली असून, या प्रकरणात राजकीय नेत्यांचा सहभाग असल्यास त्यांच्यावर कारवाई व्हावी, असेही स्पष्ट केले.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...